धक्कादायक!!! मुंबईत कोव्हिड रुग्णालयाला आग ; एकाचा मृत्यू

0
41
apex hospital
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील मुलुंडच्या अॅपेक्स रूग्णालयाच्या जनरेटरला काल संध्याकाळच्या सुमारास आग लागली होती. या आगीत एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तर जनरेटलही जळाल्यामुळे रुग्णालय अंधारात गेले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 11 बंब घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. या रुग्णालयातील रुग्णांना अनेक खासगी रुग्णवाहिकांच्या मदतीने इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

दरम्यान अग्निशमन दलाने आग अटोक्यात आणली आहे. अॅपेक्स हॉस्पिटमध्ये कोरोना रुग्ण उपचार घेत होते. आगीची माहिती मिळताचा खासगी रुग्णवाहिकांच्या मदतीनं अन्य रुग्णांना वेळीच सुरक्षीत स्थळी हालवण्यात आलं. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं सांगण्यात आले आहे.

अॅपेक्स रुग्णालयाच्या जनरेटरला लागलेल्या आगीचं निश्चित कारण काय. याचा पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी शोध घेत आहेत. फोर्टिस रुग्णालयाच्या प्रवक्त्यानेही एपेक्स रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर कोव्हिड-19 रुग्णांना फोर्टिसमध्ये दाखल करण्यात आलेल्या माहितीला दुजोरा दिलाय. मात्र, रुग्णांच्या परिस्थितीबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here