LIC च्या ‘या’ पॉलिसीद्वारे मिळवा दरमहा 20 हजार रुपयांची पेन्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC : कोरोना काळानंतर लोकांमध्ये इन्शुरन्स बाबत जागरूकता चांगलीच वाढल्याचे दिसून येते आहे. ज्यामुळे आजकाल लोकं कोणती ना कोणती इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करत आहेत. अशा परिस्थितीत लोकं चांगला रिटर्न देणाऱ्या प्लॅनच्या गुंतवणूक करावी. हे लक्षात घ्या कि, LIC कडे असे अनेक प्लॅन आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करून दरमहा 20 हजार रुपयांची पेन्शन मिळू शकतील. तर आज आपण LIC च्या लाइफ सेव्हिंग पॉलिसीबाबत जाणून घेउयात. याद्वारे फक्त एकदाच गुंतवणूक करून दरमहा 20 हजार रुपये पेन्शन मिळवता येईल.

No Penalty For Failure In Updating KYC Details In Policy, Says LIC

LIC चा सर्वोत्तम प्लॅन

सरकारी विमा कंपनी असल्यामुळे LIC च्या पॉलिसी गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मानल्या जातात. अशा परिस्थितीत, एलआयसीच्या लाइफ सेव्हिंग पॉलिसीबाबत आपल्याकडे माहिती असणे महत्वाचे ठरेल. तसेच या पॉलिसीमध्ये फक्त एकदाच प्रीमियम भरून दरमहा पेन्शनची गॅरेंटी दिली जाईल.

Opinion | Where has all the money gone from the system? | Mint

दरमहा मिळवा 20 हजार रुपयांची पेन्शन

हे जाणून घ्या कि, या पॉलिसीमध्ये 75 वर्षे वयाच्या व्यक्तीला 40 लाख 72 हजार रुपये गुंतवावे लागतील. त्यानंतर त्यांना दरमहा 20 हजार रुपयांची पेन्शन दिली जाईल. तसेच जर 6 लाख 10 हजार 800 रुपयांचा प्रीमियम विकत घेतला तर या प्लॅनवर त्यांना 6 लाख रुपयांची विमा रक्कम मिळेल. अशा परिस्थितीत वर्षभरासाठी 76 हजार 650 रुपये पेन्शन दिली जाईल. तसेच जर ही पेन्शन दरमहा घ्यायची असेल तर 6 हजार रुपये मिळतील. त्याच प्रकारे सहामाही आधारावर सुमारे 37 हजार रुपये पेन्शन मिळेल. एलआयसीच्या जीवन अक्षय योजनेमध्ये वर्षभरासाठी किमान 12 हजार पेन्शन उपलब्ध आहे. ही पेन्शन गुंतवणूकदाराला त्याच्या मृत्यूपर्यंत मिळते.

InsuranceDekho partners with LIC to offer latter's products - The Hindu  BusinessLine

असे आहेत पॉलिसीचे फायदे

या पॉलिसीमध्ये अनेक फायदे मिळतात. यामध्ये पॉलिसीच्या खरेदीच्या 90 दिवसांनंतर कर्जाची सुविधा मिळते. यामध्ये हवी तितकी रक्कम गुंतवता येते म्हणजेच यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा निश्चित नाही. मात्र, हा प्लॅन खरेदी करण्यासाठी किमान 1 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Pension-Plans/LIC-s-Jeevan-Akshay-VII

हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये