हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच रंगल आहे. याच दरम्यान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या एका घोषणेमुळे भाजप आणि बसपा ची कोंडी झाली आहे. समाजवादी पार्टीच्या एका फॉर्ममध्ये आपलं नाव नोंदवा आणि 300 यूनिट वीज मोफत मिळवा, असं आवाहन सपा नेते अखिलेश यादव यांनी केलं आहे.
ज्या घरगुती ग्राहकांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज हवी आहे, त्यांनी आपली नावे नोंदवावीत. असे आवाहन सपा कडून करण्यात आले आहे. समाजवादी पार्टीचे हे अभियान उद्यापासून (बुधवार) सुरू होणार आहे. समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांची नावे लिहिणार आहेत. आम्ही यूपीमध्ये समृद्धीसाठी काम करू, असे अखिलेश यादव म्हणाले.
ज्या लोकांनी वीज वापरली नाही किंवा ज्यांच्याकडे मीटरच नाहीये, अशा लोकांनाही वीजबिल पाठवण्यात आलंय. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाहीये. जनावरे दगावली त्याचीही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाहीये. असं यादव म्हणाले.