अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा; पहा कोणी केली मागणी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डबल इंजिन सरकारला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरं इंजिन लागलं आणि महायुतीचे बळ वाढलं. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला सपशेल अपयश आलं आणि पराभवच खापर एकमेकांवर फोडण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून अजित पवारांना (Ajit Pawar) महायुतीत घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता तर थेट भाजप नेत्यानेच अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.

भाजपची शिरूर लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला आमदार राहुल कुल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यांच्यासमोरच भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको असं भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे.

अजित पवारांनी सुभाष बाप्पू, योगेश दादा या तिघांवर अन्याय केला. हे तिघेही मंत्री झाले असते. अनेकांना महामंडळ मिळाले असते. अजितदादा असतील तर ही सत्ता आणि ही खुर्ची नको. अजितदादांसाठी सत्ता आणायची का? असा सवालही भाजपतो कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. ज्या राष्ट्रवादीचा आम्ही दहा वर्षापासून विरोध करतोय तीच राष्ट्रवादी आता सोबत घेतली आहे. त्याच राष्ट्रवादीच्या अजित दादांनी तुम्ही आमच्या बोकांडी बसवलं आहे. विधानसभेला अजितदादा सोबत असतील आणि सत्ता मिळणार असेल तर ती सत्ता आपल्याला नकोय अशी असं म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खदखद बाहेर काढली.