नवी दिल्ली । बाजारात अनेक क्रेडिट कार्डे आहेत जी वेगवेगळ्या कॅटेगिरीमध्ये खर्च करणाऱ्यांच्या गरजा पूर्ण करतात. खरेदी आणि प्रवास लक्षात घेऊन अनेक क्रेडिट कार्डची रचना करण्यात आली आहे. क्रेडिट कार्ड चातुर्याने वापरण्याची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या खर्चाची पद्धत आणि लाईफ स्टाईलला अनुरूप असे कार्ड मिळवणे. आजकाल क्रेडिट कार्डवरील कॅशबॅक फीचर्स खूप लोकप्रिय आहेत. आज आम्ही आपल्याला बाजारातील सध्याच्या अशा 5 क्रेडिट कार्डांबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यामध्ये उत्तम कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहेत.
Amazon Pay ICICI Bank Credit Card
प्राइम मेम्बर्ससाठी 5 टक्के आणि नॉन-प्राइम मेम्बर्ससाठी 3 टक्के, Amazon Pay ICICI Bank Credit Card द्वारे Amazon App किंवा वेबसाइटवर खरेदीसाठी अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध आहेत. Amazon वर, या कार्डद्वारे रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठी 2 टक्के अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध आहेत. Amazon व्यतिरिक्त कोठेही पेमेंट केल्यावर 1% अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स दिले जातात.
Flipkart Axis Bank Credit Card
Flipkart Axis Bank Credit Card द्वारे Flipkart आणि Myntra वर केलेल्या खरेदीसाठी 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. या कार्डसह, PVR, Uber, Swiggy, Cure.Fit, Tata Sky इत्यादींवर खर्च करण्यासाठी 4 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे तर इतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंटवर 1.5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळतो.
Axis ACE Credit Card
Axis Bank Ace Credit Card द्वारे Google Pay रिचार्ज आणि बिल पेमेंटवर 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. Big Basket आणि Grofers वर केलेल्या खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक, Swiggy, Zomato आणि Ola वर 4 टक्के आणि इतर सर्व खर्चांवर 2 टक्के.
HSBC Cashback Credit Card
HSBC Cashback Credit Card द्वारे सर्व ऑनलाइन खर्चांवर (वॉलेट रीलोड वगळता) 1.5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे, तर इतर प्रकारच्या खर्चांवर 1 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. याशिवाय, तुम्हाला काही लिस्टेड मर्चंटवरील EMI ट्रान्सझॅक्शनवर कॅशबॅक देखील मिळतो. या कार्डचे वार्षिक मोफत 750 रुपये आहे.
HDFC Millenia Credit Card
HDFC Millenia Credit Card द्वारे Amazon, Flipkart, BookMyShow, Cult.fit, Myntra, Sony LIV, Swiggy, Tata CLiQ, Uber आणि Zomato वर खर्च केल्यास 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. याशिवाय इंधन वगळता सर्व खर्चावर 1 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे.