हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC : देशातील सर्वांत मोठी लाईफ इन्शुरन्स कंपनी असलेल्या LIC कडून नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. एलआयसीच्या या वेगवेगळ्या पॉलिसी अंतर्गत नागरिकांना विविध प्रकारचे फायदे दिले जातात. तसेच यापैकी अनेक योजनांमध्ये कोणताही टॅक्स देखील द्यावा लागत नाही. यामध्ये कर्जासोबतच इतर सुविधाही दिल्या जातात. LIC Jeevan Tarun ही अशीच एक पॉलिसी आहे, जी खास मुलांना लक्षात घेऊनच तयार करण्यात आली आहे.
हे लक्षात घ्या कि, LIC Jeevan Tarun हा एक नॉन लिंंक्ड, पार्टिसिपेटिंग प्लॅन आहे. ज्याअंतर्गत मुलांचे शिक्षण आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन गुंतवणूक करता येते. LIC च्या या पॉलिसी अंतर्गत 90 दिवसांपासून ते 12 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. मात्र यासाठी 20 वर्ष प्रीमियम भरावा लागेल.
आपल्या सोयीनुसार प्रीमियम निवडण्याचा पर्याय उपलब्ध
इथे हे जाणून घ्या कि, 75,000 रुपयांपर्यंतच्या किमान विमा रकमेसाठी ही पॉलिसी घेता येते. फक्त मुलांच्या नावावर खरेदी करता येऊ शकणाऱ्या या पॉलिसीसाठी कोणतीही कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. तसेच मुलांच्या नावावर घेतली असल्याने याचा लाभ इतर कोणालाही घेता येत नाही. या पॉलिसीची खास बाब अशी कि, यामध्ये आपल्या सोयीनुसार मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियमची रक्कम जमा करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
अशा प्रकारे मिळेल लाखोंचा फायदा
ही पार्टिसिपेटिंग लिमिटेड पेमेंट असणारी स्कीम आहे. ज्याअंतर्गत, 20 वर्षांसाठी प्रीमियम जमा करावा लागेल. या पॉलिसीमध्ये दरमहा 150 रुपयांची गुंतवणूक केली तर वार्षिकरित्या 54 हजार रुपये जमा होतील. म्हणजेच आठ वर्षांत डिपॉझिट्सची एकूण रक्कम 4 लाख 32 हजार रुपये होईल. यानंतर मॅच्युरिटीवर 2 लाख 47 हजार रुपयांचा बोनस मिळेल.
किती रक्कम मिळेल ते जाणून घ्या
या पॉलिसी अंतर्गत 97,000 रुपयांच्या लॉयल्टी बोनससहीत 5 लाख रुपये मिळतील. म्हणजेच मॅच्युरिटीवर एकूण 8 लाख 44 हजार 550 रुपये दिले जातील. तसेच या पॉलिसी अंतर्गत जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर प्रीमियम देखील माफ केला जाईल आणि विम्याची पूर्ण रक्कमही दिली जाईल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Insurance-Plan/jeevan-tarun
हे पण वाचा :
SBI कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकड्न कर्ज घेणे महागले
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 271 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या आजचे नवीन भाव
Multibagger Stocks : 2022 मध्ये ‘या’ 5 कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिला 2,481% पर्यंत रिटर्न
AU Small Finance Bank : देशातील ‘या’ सर्वात मोठ्या स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या व्याजदरात केली वाढ