SIP मध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करून मिळवा कोट्यवधी रुपये !!!

SIP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SIP : रशिया- युक्रेन युद्धामुळे जगभरात आर्थिक मंदी सदृश वातावरण आहे. ज्यामुळे शेअर बाजारात सतत चढ-उतार होत आहेत. मात्र, असे असूनही काही म्युच्युअल फंडांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहेत. म्युच्युअल फंडामध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणुक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळेल. यामध्ये एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये पैसे गुंतवता येतात. म्युच्युअल फंडामधील गुंतवणूकीची पूर्ण पारदर्शकता असते. यामध्ये फंड हाउस मॅनेजर आपले पैसे वेगवेगळ्या स्टॉकमध्ये गुंतवतात. तसेच कोणत्या स्टॉकमध्ये आपले किती पैसे गुंतवले जात आहेत याची देखील संपूर्ण माहिती आपल्याला ऑनलाइन मिळवता येते.

Top 3 Benefits Of Systematic Investment Plan SIP In Mutual Funds

नवीन गुंतवणूकदारांसाठी SIP खूप फायदेशीर आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला आपल्या सोयीनुसार आणि उत्पन्नानुसार गुंतवणूक करता येईल. यामध्ये आपल्याला हप्त्यांमध्ये देखील पैसे गुंतवता येतील. एसआयपी मध्ये आपल्याला 100 रुपयांद्वारे देखील गुंतवणूक सुरु करता येईल. याचा आणखी एक फायदा असा कि, गुंतवणूकदाराला यामध्ये एकरकमी रक्कम जमा करावी लागत नाही.

Should You Stop or Continue Your SIP in the Current Market Scenario?

SIP चे अनेक फायदे आहेत. यामध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणुक केल्यास चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळेल. एसआयपी द्वारे आपल्याला म्युच्युअल फंडात फक्त 100 रुपयांमध्ये गुंतवणूक सुरू करता येते. याच्या मदतीने, आपल्याला कमी गुंतवणुकीने दीर्घकाळासाठी मोठा फंड जमा करता येईल. ज्या गुंतवणूकदाराला जास्त जोखीम घ्यायची नाही त्याला एसआयपी मध्ये गुंतवणूक करता येईल.

Systematic Investment Plan of mutual funds SIP

एसआयपीच्या मदतीने कोणत्ययी व्यक्तीला म्युच्युअल फंडामध्ये नियमितपणे गुंतवणूक करता येईल. तसेच यामधील गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेची देखील गरज नाही. बाजाराच्या हालचालीनुसार आपल्याला यामध्ये गुंतवणूक वाढवता येईल किंवा कमी करता येईल. तसेच ज्यांना शेअर बाजाराचे अगदी थोडेसे ज्ञान आहे, त्यांच्यासाठी SIP हा एक चांगला पर्याय ठरेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.sbimf.com/en-us/sip

हे पण वाचा :

Business Idea : कमी पैशांत ‘या’ व्यवसायाद्वारे करा भरपूर कमाई !!!

मास्क्ड Aadhar Card म्हणजे काय ??? अशाप्रकारे करा डाउनलोड

Stock Market : IT शेअर्समध्ये गुंतवणूक करताय… जरा थांबा !!! तज्ञ काय म्हणतात ते पहा

Investment : वाढत्या महागाईमध्ये मुलांच्या भविष्यासाठी अशाप्रकारे करा गुंतवणूक !!!

 SBI YONO App : आता ग्राहकांना डिजिटल माध्यमाद्वारे मिळणार लोन !!! नवीन सुविधेविषयी जाणून घ्या