हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) कडून नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना चालविल्या जातात. यातील बहुतेक पॉलिसी या फक्त इन्शुरन्स कव्हरसाठीच आहेत. मात्र LIC कडे अशा काही पॉलिसी देखील आहेत ज्यामध्ये गुंतवणूकदारांना इतर अनेक फायदे देखील मिळतील. जर आपल्यालाही अशा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी आपल्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल.
एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून इन्शुरन्स कव्हरसहीत चांगला रिटर्न देखील मिळेल. या पॉलिसीची एक खास बाब अशी कि, यामध्ये दररोज 100 रुपयांपेक्षा कमी पैशांची गुंतवणूक करून चांगला रिटर्न मिळू शकेल.
दुप्पट बोनस उपलब्ध
LIC च्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीच्या वेळी गुंतवणूकदारांना फिक्स्ड रिटर्न मिळेल. तसेच यामध्ये दोनदा बोनस मिळवण्याची संधी देखील मिळते. यामधील बेसिक प्लॅन मध्ये 5 लाख रुपयांची विमा रक्कम आणि 8.60 लाख रुपयांचा रिव्हिजनल बोनस मिळेल. याबरोबरच, जर यामध्ये 15 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केली तर दुप्पट बोनसही मिळेल. हे जाणून घ्या कि, 18 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाच्या कोणत्याही नागरिकाला एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करता येईल.
नफ्याचे गणित समजून घ्या
LIC च्या या पॉलिसीमध्ये गुंतवणुकीसाठी 5 लाख रुपयांच्या प्लॅनची निवड केल्यास प्रीमियम म्हणून दरवर्षी सुमारे 27 हजार रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच, यानुसार, दरमहा सुमारे 2300 रुपये प्रीमियम भरावा लागेल. अशाप्रकारे पुढील 21 वर्षांत यामध्ये सुमारे 5.60 लाख रुपये जमा होतील. त्याच वेळी, बोनससहीत 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळेल.
पॉलिसीचे इतर फायदे जाणून घ्या
एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूकदारांना इतरही अनेक फायदे मिळतील. यामध्ये अपघाती मृत्यू, अपंगत्व, टर्म इन्शुरन्स आणि गंभीर आजारासाठी संरक्षण इत्यादींचा समावेश आहे. तसेच यापॉलिसी अंतर्गत जर पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास, विमा रकमेच्या 125% रक्कम नॉमिनीला दिली जाईल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Insurance-Plan/anand
हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून आज 323 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित घसरण, आजचे दर तपासा
Aadhar Card 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे ??? अशा प्रकारे करा अपडेट
Bank Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता फक्त मिस कॉल अन् मेसेज द्वारे अशा प्रकारे मिळेल कृषी लोन
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 20 वर्षांत दिला 1920% रिटर्न