Kisan Vikas Patra : ‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

kisan vikas patra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kisan Vikas Patra : जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजना खूप फायदेशीर ठरेल. यामध्ये आपले पैसे तर सुरक्षित राहतीलच. तसेच त्याबरोबरच त्यावर चांगला रिटर्न देखील मिळेल. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसमध्ये अगदी कमी पैशातही गुंतवणूक करता येते. पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजनांमध्ये किसान विकास पत्राचा देखील समावेश होतो. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…

किसान विकास पत्र क्या है - What is Kisan Vikas Patra (KVP) in Hindi -  HindiBasics

व्याज दर

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्रामध्ये वार्षिक आधारावर 6.9 टक्के दराने व्याज दिला जात आहे. हे व्याज दर १ एप्रिल २०२० पासून लागू करण्यात आले आहेत. सर्वांत महत्वाचे म्हणजे यात गुंतवलेले तुमचे पैसे 124 महिन्यांत म्हणजे 10 वर्षे 4 महिन्यांत दुप्पट होतात.

गुंतवणुकीसाठीची रक्कम

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्रामध्ये कमीत कमी 1,000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. यामध्ये 100 च्या पटीत गुंतवणूक केली जाते. यामध्ये जास्तीच्या गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. यामध्ये कितीही खाती उघडता येतील. Kisan Vikas Patra

Kisan Vikas Patra: निवेश को दोगुना करने की गांरटी देती है पोस्ट ऑफिस की यह  स्कीम, जानिए क्या है प्रोसेस - Get Your Investment Doubled In Kisan Vikas  Patra Scheme Know Full

कोणाकोणाला खाते उघडता येते ???

यामध्ये एका किंवा तीन व्यक्तींना मिळून जॉईंट अकाउंट उघडता येते. यामध्ये अल्पवयीन किंवा कमकुवत मनाच्या मुलांच्या नावाने देखील पालकांना खाते उघडता येते. तसेच 10 वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलाला देखील स्वतःचे खाते उघडता येईल. Kisan Vikas Patra

मॅच्युरिटीचा कालावधी 

यामध्ये अर्थ मंत्रालयाने दिलेल्या विविध कालावधींमध्ये योजना मॅच्युर होईल. मॅच्युरिटीचा कालावधी पैसे जमा केल्याच्या तारखेपासून उपलब्ध होतील.

मॅच्युरिटीआधी अकाउंट बंद केले गेले तर …

किसान विकास पत्रामध्ये काही विशिष्ट परिस्थितीत मॅच्युरिटीआधी अकाउंट बंद केले जाऊ शकते. ज्यामध्ये सिंगल खातेधारकाचा मृत्यू झाल्यावर किंवा जॉईंट खातेदारामधील सर्वांचा मृत्यू झाल्यावर खाते बंद केले जाऊ शकते. याबरोबरच कोर्टाच्या आदेशानंतर अकाउंट सुरु केल्याच्या तारखेपासून दोन वर्ष आणि सहा महिन्यानंतरही खाते बंद करता येते. Kisan Vikas Patra

कौन सा चुने ? नेशनल सेविंग सर्टिफिकेट या किसान विकास पत्र – News Live Now

खाते ट्रान्सफर करणे

किसान विकास पत्रामध्ये काही अटींच्या अधीन राहून एका व्यक्तीचे खाते दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करता येते. तसेच खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नॉमिनीला किंवा उत्तराधिकाऱ्याकडे ट्रान्सफर करता येते. याबरोबरच मृत्यू नंतर जॉईंट खातेदाराकडे देखील ट्रान्सफर करता येईल. तसेच हे खाते कोर्टाच्या आदेशा नंतर संबंधित ऑथॉरिटीकडे गहाण देखील ठेवता येते. Kisan Vikas Patra

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx

हे पण वाचा :

Multibagger Stocks : 2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

Bank Alert : खातेदारांना फसवणुकीबाबत सावध करण्यासाठी ‘या’ बँकांनी जारी केली चेतावणी !!!

SBI कडून दरमहा 90 हजार रुपये कमावण्याची संधी, त्यासाठी काय करावे ते जाणून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीद्वारे फक्त 150 रुपयांमध्ये मिळवा 19 लाख रुपये; कसे ते जाणून घ्या

Aadhar Card चे व्हेरिफिकेशन करणे महत्वाचे का आहे ??? समजून घ्या