हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC ही देशातील सर्वात मोठी सरकारी इन्शुरन्स कंपनी आहे. सरकारी गॅरेंटीमुळे तिची विश्वासार्हता देखील जास्त आहे. यामुळेच लोकांकडून आजही इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी LIC ची निवड केली जाते. LIC कडे असे अनेक प्लॅन्स आहेत ज्यामध्ये आपल्याला भरपूर रिटर्न मिळतो. LIC ची जीवन शिरोमणी पॉलिसी देखील अशाच प्रकारची एक योजना आहे, ज्यामध्ये चांगल्या रिटर्न बरोबरच इतरही अनेक फायदे दिले जातात.
इथे हे लक्षात घ्या कि, जीवन शिरोमणी पॉलिसी ही एक प्रकारची मर्यादित प्रीमियम असणारी जीवन विमा योजना आहे. जी किमान एक कोटी रुपयांच्या बेसिक सम एश्योर्डसह घ्यावी लागेल. यामध्ये जास्तीच्या रकमेची कोणतीही मर्यादा नाही. या योजनेमध्ये वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक आधारावर प्रीमियम भरता येतो.
किमान इन्शुरन्सची रक्कम 1 कोटी रुपये
ही एक नॉन-लिंक्ड, पर्सनल, जीवन विमा बचत योजना आहे. यामध्ये मर्यादित कालावधीसाठी प्रीमियम भरावा लागतो. ही पॉलिसी विशेषतः जास्त उत्पन्न असलेल्या लोकांना लक्षात घेऊन तयार केली गेली आहे. या योजनेअंतर्गत, पाच वर्षांसाठी 50 प्रति हजार रुपये दराने आणि सहाव्या वर्षापासून प्रीमियम भरण्याची मुदत उपलब्ध होईपर्यंत 55 प्रति हजार रुपये दराने बेसिक सम एश्योर्ड मिळतो. याशिवाय जीवन शिरोमणी पॉलिसीसोबत लॉयल्टीच्या रूपात नफाही जोडला जाईल.
प्रीमियम पेमेंट
या पॉलिसीमध्ये बेसिक सम एश्योर्ड 1 कोटी रुपये आहे. यासाठी पॉलिसीधारकाला फक्त चार वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर रिटर्न मिळेल. त्यासाठी पॉलिसीधारकांना दरमहा सुमारे 94,000 रुपये जमा करावे लागतील.
असे पर्याय आहेत
या पॉलिसीमध्ये 14, 16, 18 आणि 20 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. 14 वर्षांच्या पॉलिसीमध्ये विमा रकमेच्या 30% रक्कम 10 व्या वर्षी आणि फक्त 30% 12 व्या वर्षी उपलब्ध असते. विम्याची रक्कम 12 व्या वर्षी 30% आणि 16 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 14 व्या वर्षी 35% आहे. 18 वर्षांच्या पॉलिसीमध्ये, 40% 14 व्या आणि 45% 16 व्या वर्षी विमा रक्कम उपलब्ध आहे. 20 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 45% 16 व्या वर्षी आणि 45% 18 व्या वर्षी विमा रक्कम उपलब्ध आहे.
कर्ज घेता येते
या पॉलिसीमध्ये कर्जाची सुविधा देखील दिली जाते. मात्र, यासाठी काही अटींसह किमान एक वर्षाचा प्रीमियम भरावा लागेल. तसेच पॉलिसीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच कर्ज मिळेल.
कोणाकोणाला गुंतवणूक करता येईल ???
कोणत्याही भारतीय नागरिकाला ही पॉलिसी घेता येईल. मात्र हे लक्षात घ्या कि, यामध्ये 14 वर्षांच्या पॉलिसीसाठी जास्तीची वयोमर्यादा 55 वर्षे आहे. 16 वर्षांच्या पॉलिसीसाठी 51 वर्षे, 18 वर्षांच्या पॉलिसीसाठी 48 वर्षे आणि 20 वर्षांच्या पॉलिसीसाठी 45 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Insurance-Plan/LIC-s-Jeevan-Shiromani-(Plan-No-947,-UIN-512N315V0
हे पण वाचा :
Car Loan : सेकंड हँड कारसाठी कर्ज कसे मिळवावे ते जाणून घ्या
Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा पैसे दुप्पट !!!
Credit Card द्वारे खरेदी करताना कोणत्या गोष्टींचे बिल EMI मध्ये कन्व्हर्ट करता येत नाही तेजाणून घ्या
Bank of Baroda ने चेक पेमेंटच्या नियमांमध्ये केले महत्वाचे बदल, चेक देण्यापूर्वी जाणून घ्या
PM Kisan योजनेचा लाभ पती आणि पत्नी दोघांनाही मिळू शकेल का ???