हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG : सध्याच्या डिजिटल युगात इंटरनेटच्या वापरामुळे सर्व कामे खूप सोपी झाली आहेत. इंटरनेटमुळे घरबसल्या ऑनलाइन बुकिंगपासून ते ऑनलाइन शॉपिंगपर्यंत सर्व काही करता येते. अशा परिस्थितीत गॅस सिलेंडर बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता नवीन गॅस कनेक्शन घ्यायचे असेल किंवा गॅस सिलेंडर बुक करायचा असेल तर हे काम मिस्ड कॉलद्वारे करता येऊ शकेल. यासाठी सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून अनेक पर्याय दिले गेले आहेत. या कंपन्यांच्या कोणत्याही सर्व्हिसेसचा फक्त मिस्ड कॉलद्वारे लाभ घेता येईल. LPG
सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने ग्राहकांसाठी एक मिस कॉल नंबर जारी केला आहे. याबाबत कंपनीने सांगितले की,” आता आपल्याला आपल्या घराच्या दारातच सिलेंडर किंवा गॅस कनेक्शन मिळेल. आता त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त एक कॉल आणि सिलेंडर आपल्या घरी पोहोचेल. यासाठी फक्त मोबाईलवरून 8454955555 नंबर डायल करायचा आहे आणि LPG कनेक्शन घरी पोहोचेल.”
मिस्ड कॉलनंतर काय करावे ते जाणून घ्या
8454955555 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर इंडेनकडून एक मेसेज देण्यात येईल. त्यानंतर एक लिंक दिली जाईल. यासाठी या लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर फक्त आपली माहिती विचारली जाईल. ही सर्व माहिती दिल्यानंतर हे सर्व डिटेल्स सबमिट करावे लागतील. यानंतर तुमच्या भागातील डिस्ट्रीब्यूटर तुमच्याशी कनेक्ट होईल. या प्रक्रियेनंतर,आपल्या गॅस सिलेंडरशी संबंधित सर्व्हिस घरपोच मिळेल. LPG
सिलेंडर रिफिल करा
याद्वारे ग्राहकांना आपले सिलेंडरही रिफिल करता येतील. या नंबरवर मिस्ड कॉल करून तो सिलेंडर रिफिल करू शकतो. जुन्या ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर्ड क्रमांकावरून कॉल करावा लागेल. LPG
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://cx.indianoil.in/webcenter/portal/LPG/pages_bookyourcylinder
हे पण वाचा :
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा
Post Office च्या ‘या’ योजनेत 100 रुपयांपासून गुंतवणूक करून मिळवा भरपूर रिटर्न
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, आजचा भाव पहा
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी मिळेल Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन
Bank of Baroda च्या ग्राहकांना आता FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा