हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car Loan : कोरोना महामारीनंतर अनेक लोकं स्वतःचे वाहन खरेदी करण्यात रस दाखवत आहेत. ज्यामुळे देशभरात वाहनांची मागणी वाढते आहेत. अशातच सेकंड हँड कारच्या मागणीतही लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. ज्याच्या परिणामी आता बहुतांश कार कंपन्या देखील सेकंड हँड कार विकत आहेत. याबरोबरच या कंपन्या फायनान्सची सुविधा देखील देत आहेत. आता सेकंड हॅन्ड कार्सना झिरो डाऊन-पेमेंटने फायनान्स केला जातो, मात्र त्यावर जास्त व्याज द्यावे लागेल.
कमी व्याजदरात सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी कर्ज मिळवण्यासाठी आम्ही काही टिप्स सांगणार आहोत. त्याविषयी जाणून घ्या …
व्याजदराची तुलना करा
सेकंड हँड कार घेण्यासाठी बँक किंवा नॉन बँकिंग कंपनीकडून कर्ज घेता येऊ शकेल. मात्र, हे लक्षात घ्या कि, सेकंड हँड कारवर कर्ज घेतल्यास जास्त व्याज द्यावे लागते. प्री-ओन्ड कार लोनसाठीचे दर सुमारे 10% पासून सुरू होतात, तर नवीन कारवरील कर्जाचे दर सुमारे 7% इतके कमी असते. हा व्याजदर ग्राहकाची क्रेडिट हिस्ट्री आणि कारच्या प्रकारावरही अवलंबून असेल. म्हणूनच कर्ज घेताना व्याजदराची चांगली तुलना करणे महत्त्वाचे आहे. इथे काही बँकांच्या व्याजदरांबाबतची माहिती देत आहोत. Car Loan
बँक व्याजदराचे (अंदाजे)
स्टेट बँक ऑफ इंडिया 9.25% – 12.75%
टाटा कॅपिटल 15% पासून सुरू
HDFC बँक 13.75% – 16.00%
पंजाब नॅशनल बँक 7.75% पासून सुरू
एक्सिस बँक 13.25% – 15.00%
प्री-अप्रूव्ड लोनद्वारे कार खरेदी
कार खरेदीसाठी प्री-अप्रूव्ड लोन देखील निवडता येते. ज्यांना सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी लोन घ्यायचे आहे त्यांनी आपल्या क्रेडिट प्रोफाइलवर उपलब्ध असलेल्या पर्सनल लोनच्या ऑफर देखील तपासल्या पाहिजेत. पर्सनल लोन तुलनेने स्वस्त आहेत. त्यांच्या क्रेडिट प्रोफाइलवर अवलंबून, खरेदीदारांना कर्जाची मोठी रक्कम, दीर्घ कालावधी आणि कमी व्याजदर मिळू शकतील. Car Loan
टॉप अप लोन घेऊन कार खरेदी
ज्या ग्राहकांनी आधीच घरासाठी होम लोन घेतले आहे ते टॉप-अप होम लोन घेऊ शकतात. अशा ग्राहकांना उर्वरित कर्ज कालावधी आणि थकित कर्जाच्या रकमेवर आधारित टॉप-अप होम लोन मिळवून कमी व्याजदरात जास्त कालावधी आणि जास्त कर्ज मिळू शकेल. Car Loan
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/car-loan.html
हे पण वाचा :
Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा पैसे दुप्पट !!!
Credit Card द्वारे खरेदी करताना कोणत्या गोष्टींचे बिल EMI मध्ये कन्व्हर्ट करता येत नाही तेजाणून घ्या
Cyber Froud : ऑनलाईन फसवणूक झालेल्या लोकांना 24 तासात मिळणार पैसे परत, कसे ते जाणून घ्या
Bank of Baroda ने चेक पेमेंटच्या नियमांमध्ये केले महत्वाचे बदल, चेक देण्यापूर्वी जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ, नवीन भाव पहा