हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car : आता 2022 हे आर्थिक वर्ष संपण्यास अवघे दोनच दिवस बाकी आहेत. यासोबतच आता ऑटोमोबाईल कंपन्यादेखील नवीन वर्षासाठी सज्ज झाल्या आहेत. भारतीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक वाहने आणि ऑटो एक्स्पो 2023 दाखल झाले आहेत. ज्यामुळे ऑटो उत्पादक बाजारातील ट्रेंडमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता बाळगून आहेत. अशातच, आता वर्षाच्या शेवटी Car कंपन्यांकडून आपल्या वाहनांवर मोठ्या सवलती देण्यात येत आहेत.
भारतीय कंपन्यांबरोबरच आता अनेक परदेशी कंपन्याही यामध्ये सामील झाल्या आहेत. ज्यामुळे आता ग्राहकांना अनेक लोकप्रिय मॉडेल्सवर लाखो रुपयांपर्यंतची सवलत मिळत आहे. मात्र ही सूट का आताच दिली जात आहे असा प्रश्न आपल्या मनात डोकावला असेलच ना… तर त्यामागे देखील काही कारणे आहेत. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…
सवलत देण्यामागील कारणे जाणून घ्या
Car कंपन्यांकडून आपल्या वाहनांवर सवलत देण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे 2022 नंतर कारचे मॅन्युफॅक्चरिंग कालबाह्य होईल. जरी ते त्याची नोंदणी जानेवारी 2023 मध्ये केली तरीही तिला जुनी कारच म्हटले जाईल. ग्राहकांकडूनही नेहमीच नवीन मॉडेल आणि मॅन्युफॅक्चरिंग असलेल्या कारची मागणी केली जाते. त्यामुळे आपला जुना स्टॉक लवकरात लवकर निकालात काढण्यासाठी Car कंपन्या तसेच डीलरशिप कडून या सवलती देण्यात येत आहेत.
या वर्षीच या सवलती देण्यामागे आणखी एक मोठे कारण आहे ते म्हणजे BS6 Stage 2. हे लक्षात घ्या कि, 1 एप्रिल 2023 पासून उत्सर्जनाचे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. यानंतर BS6 इंजिन असलेल्या गाड्या विकल्या जाणार नाहीत. कारण अशा गाड्यांची विक्री ही फक्त 31 मार्च 2023 पर्यंतच करता येणार आहे. अशा परिस्थितीत डीलरशिप आणि कंपन्यांकडे आपल्या जुन्या गाड्यांचा स्टॉक कमी करण्यासाठी अवघे 3 महिनेच उरले आहेत. तसेच जर यादरम्यान त्यांनी आपला स्टॉक क्लिअर केला नाही तर त्या गाड्या कोणाच्याही उपयोगी पडू शकणार नाहीत कारण त्यांची नोंदणी होणार नाही. अशा परिस्थितीत, आपला स्टॉक क्लिअर करण्यासाठी कंपनी तसेच डीलरशिपकडून मोठ्या सवलती दिल्या जात आहेत.
जुनी Car योग्य ठरेल का ???
जुने उत्सर्जन मानक असलेल्या गाड्या खरेदी करण्यात कोणतेही नुकसान नाही. एक प्रकारे हा फायदाच ठरेल. मात्र नवीन उत्सर्जन मानक असलेल्या गाड्यांमध्ये नवीन तंत्रज्ञान मिळेल. ज्याद्वारे प्रदूषण तर कमी होईलच, त्याबरोबरच अशा गाड्यांमध्ये जास्त मायलेज मिळेल. अशा परिस्थितीत जर आपल्याला दीर्घकालीन फायदा हवा असेल तर नवीन कार घेणेच योग्य ठरेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.cardekho.com/newcars
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत आज झाला बदल, जाणून घ्या नवीन दर
LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणुक करून मिळवा दुप्पट बोनस !!!
BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये 400 दिवसांच्या व्हॅलिडिटी सोबत मिळवा 750GB डेटा
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न, कसे ते जाणून घ्या
Bank Of Baroda कडून FD वर मिळणार 7.80% पर्यंत व्याज, याचा लाभ कसा घ्यावा ते पहा