नवी दिल्ली । राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आयुष्मान भारत डिजिटल मिशनला आरोग्य अॅप – आरोग्य सेतूशी जोडण्याची घोषणा केली आहे. याद्वारे, आरोग्य सेतूचे युझर्स 14 अंकी युनिक आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांकाचा लाभ घेऊ शकतील.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण- NHA ने त्यांच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन-ABDM या प्रमुख योजनेअंतर्गत आरोग्य सेतू सह करण्याची घोषणा केली आहे. हे एकत्रीकरण 14 अंकी युनिक ABHA-आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांकचा लाभ आरोग्य सेतू युझर्सना वाढवेल.
ABDM अंतर्गत, युझर्स आपला युनिक ABHA क्रमांक तयार करू शकतो. युझर्स डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, लॅब रिपोर्ट्स, हॉस्पिटल रेकॉर्ड इत्यादींसह आपले सध्याचे आणि नवीन मेडिकल रेकॉर्ड लिंक करण्यासाठी ABHA नंबर वापरू शकतात आणि हे रेकॉर्ड डॉक्टर किंवा हॉस्पिटलसह शेअर करू शकतात.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केले की, 21.4 कोटींहून जास्त आरोग्य सेतू युझर्स आता अॅपवरून 14-अंकी युनिक आयुष्मान भारत आरोग्य खाते (ABHA) क्रमांक तयार करू शकतील. हे एकत्रीकरण डिजिटल आरोग्य परिसंस्था मजबूत करेल. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण-NHA मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर.एस. शर्मा म्हणाले की,”कोविड महामारीमध्ये आरोग्य सेतूने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महामारीच्या काळात या मोबाईल अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे.”
आरोग्य सेतूचा वापर
त्यांनी सांगितले की,”आता परिस्थिती सामान्यतेकडे जात असल्याने हे डिजिटल अॅप पुन्हा वापरणे गरजेचे होते. आरोग्य सेतूचे ABDM सोबत एकत्रीकरण केल्याने, आम्ही आता आरोग्य सेतूच्या युझर्सना ABDM चे फायदे देऊ शकू. युझर्सना त्यांच्या संमतीने डिजिटल हेल्थ इकोसिस्टममध्ये सामील होण्यास सक्षम करू शकू. ABHA ची निर्मिती ही फक्त सुरुवात आहे आणि आम्ही लवकरच तुमच्या डिजिटल आरोग्य नोंदी पाहण्याची सुविधा सुरू करणार आहोत.”
आरोग्य सेतू अॅप मध्ये प्रचंड ऍक्टिव्ह युझर्स आधार आहे आणि कोविड-19 संबंधित कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळवण्यापासून ते जोखीम शोधण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी त्याचा वापर केला जात आहे. कोविड-19 लस बुक करणे, सर्टिफिकेट डाउनलोड करणे आणि ई-पास तयार करणे यासाठी देखील याचा वापर केला जात आहे.
या अॅप द्वारे, कोविड चाचणी सुविधा, हेल्पलाइन कॉन्टॅक्ट आणि इतर COVID-19 डेटा आणि अपडेट्स देणार्या लॅब्स देखील शोधल्या जात आहेत. आता ABDM सह हे एकत्रीकरण आरोग्य अॅप युझर्ससाठी ABHA नंबर जनरेट करण्यासाठी आणखी एक वैशिष्ट्यफिचर जोडेल.
अशाप्रकारे नंबर तयार करा
ABHA क्रमांक तयार करणे अगदी सोपे आहे. युझर्स आपला आधार क्रमांक आणि काही आवश्यक तपशील जसे की नाव, जन्म वर्ष, लिंग आणि पत्ता वापरून त्यांचा ABHA क्रमांक तयार करू शकतात. जर युझर्सना आपला आधार क्रमांक वापरायचा नसेल, तर ते त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मोबाइल नंबर वापरून ABHA क्रमांक तयार करू शकतात. युझर्स abdm.gov.in किंवा ABHA App किंवा ABDM च्या इतर अॅप्सवरून आपला ABHA क्रमांक तयार करू शकतात.