सातारा : हॅलो महाराष्ट्र – साताऱ्यामध्ये दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. साताऱ्यातील करंजे या ठिकाणी हा राडा झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या दोन गटांत झालेल्या हाणामारीत काहीजण जखमीसुद्धा झाले आहेत. सातारा शहरालगत असणाऱ्या करंजे गावामध्ये शुक्रवारी रात्री दोन गटात हि तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत काहीजण जखमी झाल्याचे समोर आले आहे.
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) February 12, 2022
या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन गटातील युवक आमने-सामने आले आणि त्यानंतर जोरदार राडा झाला. जवळपास 20 ते 25 युवकांमध्ये हि हाणामारी सुरू होती. यावेळी दोन्ही बाजूने दगडफेकसुद्धा करण्यात आली. या घटनेचा जो विडिओ समोर आला आहे त्यामध्ये काही लोकांच्या हातात धारदार शस्त्रसुद्धा आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.
सोलापुरात गुंडांकडून ऑन कॅमेरा खंडणी वसुली
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या ठिकाणी खंडणीची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन खंडणीखोरांनी एका व्यापाऱ्याला लुटले आहे. या आरोपींनी खडी क्रॅशरवर जाऊन व्यापाऱ्याला धक्काबुक्की करत त्याच्याकडून 50 हजार रुपये रुपये उकळले आहेत. हा सगळा धक्कादायक प्रकार पीडित व्यापाऱ्याच्या जवळच्या एका कर्मचाऱ्याने धाडस करून आपल्या मोबाइलमध्ये शूट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.