हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart द्वारे वारंवार खरेदी करत असाल तर फ्लिपकार्ट Axis Bank Super Elite Credit Card आपल्यासाठी एक चांगले कार्ड ठरू शकेल. नुकतेच हे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लाँच करण्यात आले आहे. या क्रेडिट कार्डद्वारे फ्लिपकार्टवर शॉपिंग केल्यावर आपल्याला 12 टक्के कॅशबॅक मिळू शकेल. हे कार्ड व्हिसा कार्ड स्वीकारणाऱ्या सर्व मर्चंट आउटलेट किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखील वापरले जाऊ शकते.
या कार्डचे खास फीचर्स
>> कार्डचे एक्टिव्हेशन केल्यानंतर कार्ड धारकांना 500 Flipkart Supercoins मिळतात. Supercoins हे फ्लिपकार्टची रिवॉर्ड सिस्टीम आहे. काही प्रकरणांमध्ये, फ्लिपकार्टद्वारे खरेदी केल्यावर 1 सुपरकॉइनचे मूल्य 1रुपये आहे.
>> जर आपण Flipkart Plus चे ग्राहक असाल तर या कार्डद्वारे आपल्याला Flipkart वर खरेदी करण्यासाठी 12 टक्के SuperCoins मिळतील. मात्र, एका महिन्यात फक्त 2500 रुपयांपर्यंतच्या खरेदीवरच SuperCoins मिळवू शकाल. याचा अर्थ Flipkart Plus चे ग्राहक या कार्डद्वारे एका महिन्यात जास्तीत जास्त 300 सुपरकॉइन्स मिळवू शकतील.
>> जर आपण फ्लिपकार्ट Plus चे ग्राहक नसाल तर या कार्डद्वारे केलेल्या Flipkart वरील खरेदीवर 6 टक्के SuperCoins मिळतील. मात्र, एका महिन्यात फक्त 2500 रुपयांपर्यंतच्या खरेदीवरच SuperCoins मिळवू शकाल. याचा अर्थ असा की, नॉन-फ्लिपकार्ट प्लस ग्राहक या कार्डद्वारे एका महिन्यात जास्तीत जास्त 150 सुपरकॉइन्स मिळवू शकतील.
>> 2% अनलिमिटेड SuperCoins इतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंटवर उपलब्ध आहेत.
>> कार्डधारकालाही फ्यूलसरचार्ज माफीचा फायदा देखील मिळतो.
>> हे कार्ड कॉन्टॅक्टलेस तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, जे ग्राहकांना ‘टॅप अँड पे’ ची सुविधा देखील देते. म्हणजेच हे कार्ड स्वाइप न करता फक्त पीओएस मशीनवर टॅप करून पेमेंट करता येते. हे लक्षात घ्या की, आपल्याला कॉन्टॅक्टलेस कार्डने पिन न टाकता 5 हजार रुपयांपर्यंतचे पेमेंट करता येते.
कार्डचे शुल्क
>> या कार्डची जॉइनिंग फी 500 रुपये आहे.
>> या कार्डची वार्षिक फी 500 रुपये आहे. मात्र, वर्षभरात दोन लाख रुपये खर्च केल्यानंतर वार्षिक शुल्क रिव्हर्स केले जाते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/
हे पण वाचा :
Paytm कडून ग्राहकांना धक्का !!! आता वॉलेट बॅलन्समधून क्रेडिट कार्डचे बिल भरणे महागले
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 15 वर्षात दिला 18110% रिटर्न !!!
Har Ghar Tiranga Yojana : टपाल विभागाने वितरित केले 1 कोटींहून जास्त राष्ट्रध्वज !!!
Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदी घसरली, नवीन दर पहा
Aadhar card मध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख किती वेळा बदलता येईल ??? अशाप्रकारे जाणून घ्या