Paytm कडून ग्राहकांना धक्का !!! आता वॉलेट बॅलन्समधून क्रेडिट कार्डचे बिल भरणे महागले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण क्रेडिट कार्डचे बिल Paytm App वरून भरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. वास्तविक, आपल्या ग्राहकांना धक्का देत कंपनीने पेटीएम वॉलेट बॅलन्समधून क्रेडिट कार्डचे बिल भरणे महाग केले आहे.

Paytm news! Exclusive: New feature added in Paytm, making credit card bill payment easier - Business League

कंपनीकडून 1.18% प्लॅटफॉर्म फी आकारली जाणार

हे लक्षात घ्या कि, याआधी वॉलेट बॅलन्समधून क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नव्हते. मात्र आता कंपनीकडून अशा पेमेंटसाठी 1.18 टक्के प्लॅटफॉर्म फी आकारली जाणार आहे. म्हणजेच जर आपल्या क्रेडिट कार्डचे बिल 10,000 रुपये असेल, तर Paytm Wallet द्वारे पेमेंट करताना 10,118 रुपये द्यावे लागतील.

Here's how Paytm's businesses are unaffected by the changes to digital payment charges. - Impact Feature News

क्रेडिट कार्ड बिल भरताना पेमेंट मोड म्हणून अनेक पर्याय उपलब्ध

Paytm App द्वारे क्रेडिट कार्डचे बिल भरताना पेटीएम वॉलेट बॅलन्स, UPI, पेटीएम बँक, डेबिट कार्ड आणि नेटबँकिंग हे पेमेंट पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. इथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जर आपण क्रेडिट कार्ड बिल UPI, पेटीएम बँक, डेबिट कार्ड आणि नेटबँकिंगद्वारे भरले तर त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.

Paytm launches new digital payment feature

Paytm App द्वारे अशा प्रकारे क्रेडिट कार्डचे बिल भरा…

1. सर्वांत आधी पेटीएम ऍप्लिकेशन अपडेट करा.
2. आता Paytm App उघडा.
3. यानंतर Recharge and Bill Payment सेक्शनमधील Credit Card Payment वर क्लिक करा.
4. जर आपण पहिल्यांदाच कार्डचे पेमेंट करणार असाल, तर Pay Bill For New Credit Card वर क्लिक करा. त्यानंतर कार्ड नंबर टाका आणि Proceed वर क्लिक करा.
5. आता पेमेंट मोड निवडा. त्यानंतर पेटीएम वॉलेट बॅलन्स, यूपीआय, पेटीएम बँक, डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे पेमेंट करा.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://paytm.com/

हे पण वाचा :

‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 15 वर्षात दिला 18110% रिटर्न !!!

Har Ghar Tiranga Yojana : टपाल विभागाने वितरित केले 1 कोटींहून जास्त राष्ट्रध्वज !!!

Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदी घसरली, नवीन दर पहा

Kotak Mahindra Bank च्या एफडीवरील व्याज दरात वाढ, नवीन दर तपासा

Bank FD : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने देखील FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर पहा