हैदराबाद । हैदराबाद महानगरपालिकेच्या (GHMC) निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली असून आज ११२२ उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. सुरुवातीला आलेल्या कलानुसार भाजपाने (BJP) जोरदार मुसंडी मारली होती. मात्र, आता चित्र पालटलं असून भाजपची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) सध्या आघाडीवर असून एआयएमआयएम (AIMIM) दुसऱ्या स्थानावर आहे.
मतमोजणीच्या ताज्या कलानुसार, टीआरएस 71 जागांवर पुढे आहे. तर एआयएमआयएमने 43 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपाची 34 जागांवर घोडदौड सुरु आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर असताना भाजप नेत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रारंभीच्या ट्रेंडविषयी ट्विट केले. यात त्यांनी भाग्यनगर लिहिले. योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर असे म्हटले होते.मात्र आता, बाजी पलटली असून भाजपची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. मात्र, २०१६च्या तुलनेत भाजपची काहीशी प्रगती होताना दिसत आहे.
भाग्यनगर pic.twitter.com/2wgFgSeCMR
— Sambit Patra (@sambitswaraj) December 4, 2020
दरम्यान, टीआरएस आणि ओवेसींच्या गडात पाय रोवण्यासाठी पहिल्यांदाच भाजपाने महापालिकेसारख्या छोट्या निवडणुकीत मोठी ताकद लावली होती. भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील प्रचारात आले होते. केंद्रीय मंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ देखील आले होते. (Ghmc Election Result 2020 Update)
भाजपचा पराभव फाजिल नेतृत्वामुळे, 'मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही', एकनाथ खडसेंचा घणाघात
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/lLiZw5QAE9@EknathGKhadse @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @NCPspeaks @ShivSena @INCMaharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 4, 2020
लिकर किंग अतुल मदन प्रकरणात मोठा खुलासा; अवैध दारूसाठा विखे-पाटलांच्या कारखान्यातून आल्याचा संशय
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/89FdtlHJoA#HelloMaharashtra #atualmadan @RVikhePatil @BJP4Maharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 4, 2020
पदवीधर,शिक्षक मतदारसंघातील पराभवानंतर भाजपच्या 'ऑपरेशन लोट्स'चे 'तीन तेरा..
वाचा सविस्तर https://t.co/NUojwgpk6P#GHMCElectionresults #GHMCElections #operationlotus @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 4, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’