नवी दिल्ली । आपण देखील नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दिग्गज आयटी कंपनी cognizant या वर्षी जवळपास एक लाख लोकांना नोकऱ्या देणार आहे. जूनच्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 41.8 टक्क्यांनी वाढून 51.2 कोटी अमेरिकन डॉलर्स (अंदाजे 3,801.7 कोटी) झाले आहे. कंपनीने बुधवारी याबाबत माहिती दिली आहे. जून 2020 च्या तिमाहीत अमेरिकेतील कंपनीने एकूण 36.1 कोटी डॉलर्सचे उत्पन्न नोंदवले आहे.
cognizant ने आर्थिक वर्ष 21 साठीच्या कमाईच्या वाढीचे लक्ष्य 10.2-11.2 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. मागील तिमाहीत कंपनीचा महसूल 14.6 टक्क्यांनी वाढून 4.6 अब्ज डॉलर झाला आहे, जो मागील वर्षातील याच कालावधीत चार अब्ज अमेरिकन डॉलर्स होता. कंपनीच्या अंदाजापेक्षा हा आकडा जास्त आहे.
कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी माहिती दिली
कॉग्निझंट सीईओ ब्रायन हम्फ्रीजच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये आम्ही जवळपास 1 लाख भरती आणि जवळपास 1 लाख असोसिएट्सना ट्रेन करण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, cognizant 2021 मध्ये सुमारे 30,000 नवीन पदवीधर आणि 2022 साठी भारतातील नवीन पदवीधरांना 45,000 ऑफर देण्याची अपेक्षा करतो.