SBI ग्राहकांसाठी भेट! आता फक्त 4 क्लिकमध्ये झिरो प्रोसेसिंग चार्जसह घरबसल्या मिळवा पर्सनल लोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना अत्यंत कमी व्याजदरावर पर्सनल लोन देऊ केले आहे. याशिवाय, बँकेने म्हटले आहे की, ते ग्राहकांना झिरो प्रोसेसिंग चार्जवर कर्ज देतील. SBI च्या या पर्सनल लोनसाठी कधीही अर्ज केला जाऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही रात्रीच्या वेळीही लोनसाठी अर्ज केलात तर कोणतीही अडचण येणार नाही. आता YONO App वर तुम्हांला फक्त 4 क्लिकमध्ये लोन मिळेल.

मात्र, हे लोन सर्वांनाच मिळणार नाही. जे ग्राहक स्टेट बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या काही नियमांची पूर्तता करतील आणि ज्या ग्राहकांची या लोनसाठी निवड झाली आहे, त्यांनाच लोन मिळू शकेल. यासंबंधी आणखी माहिती मिळवण्यासाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाइट http://sbi.co.in ला भेट देऊ शकता.

सार्वजनिक क्षेत्रातील या सर्वात मोठ्या कर्जदाराने अलीकडेच या ऑफरबद्दल ट्विट केले आहे. बँकेने आपल्या ट्विटमध्ये पर्सनल लोनवर दिल्या जाणाऱ्या या ऑफरचे फायदे सांगितले आहेत. बँकेने म्हटले आहे की, कमी व्याज दर, झिरो प्रोसेसिंग चार्जसह आम्ही तुम्हाला योग्य निवडण्यात मदत करतो. SBI पर्सनल लोनसाठी, ग्राहकांना फक्त 9.60 टक्के वार्षिक व्याज द्यावे लागेल. 31 जानेवारी 2022 पूर्वी लोन घेतले असेल तरच झिरो प्रोसेसिंग चार्ज लागू होईल.

हे लोन कसे मिळवायचे ?
हे लोन मिळवण्यासाठी तुमच्याकडे SBI चे YONO App असणे आवश्यक आहे. तुम्ही YONO वर असाल आणि लोनसाठी पात्र असाल तर तुम्ही फक्त चार स्टेप्स फॉलो करून लोन मिळवू शकता.
1. सर्व प्रथम ग्राहकाला YONO App वर लॉग इन करावे लागेल.
2. यानंतर ग्राहकाला ‘Avail Now’ वर टॅप करावे लागेल.
3. त्यानंतर ग्राहकाला वेळ (कालावधी) आणि रक्कम (अमाउंट) भरावी लागेल.
4. यानंतर ग्राहकाला त्याच्या मोबाईलवर आलेला OTP टाकावा लागेल. OTP भरल्यानंतर कर्जाची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा होईल.

Leave a Comment