हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जिराफाची मान ही खूप मोठी असते हे आपल्याला माहीतच असेल. जिराफाची मान झाडाच्या मोठमोठ्या फाद्यांपर्यंत पोहोचू शकते. आपल्या मोठ्या मानेमुळे झाडांचा पाला खाणे जीराफाला खूप सोप्प जाते. पण जिराफाने जर गवत खायचं म्हटलं ते खूप कठीण आहे. कारण इतकी मोठी मान कशी गवतापर्यंत पोहोचणार?. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की गवत खाण्यासाठी जिराफ कशाप्रकारे शक्कल लढवत आहे.
हा व्हिडीओ ट्विटरवर युजर ‘@ डॅनीडचद्वारे शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शन दिलं आहे की, जिराफ असं गवत खाऊ शकतो असा मी विचारही केला नव्हता. गवतापर्यंत पोहोचण्यासाठी जिराफ आपल्या दोन्ही पायांना ताण देत लांब करून मान खाली पुरवत आहे. गवत खाऊन झाल्यानंतर पुन्हा नीट उभा राहत आहे. त्यानंतर परत तशीच क्रिया करत आहे. हसून हसून पोट दुखायला लावणारा हा व्हिडीओ आहे.
I’ve never wondered how a Giraffe eats grass before, but this is majestic! pic.twitter.com/9pjbTugdKm
— Daniel Holland🎗🏴 ॐ (@DannyDutch) October 12, 2020
हा व्हिडीओ सोशल मीडियावर १२ ऑक्टोबरला शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडिओला ९.७ मिलियन व्हिव्हज मिळाले आहेत. २ लाखांपेक्षा जास्त लोकांना या व्हिडीलो लाईक केलं आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’