हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशामध्ये सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी नेहमी केंद्रसरकार तत्पर असून सर्व स्तरावर मदत केली जाते. त्यामध्ये अन्नधान्य व गोरगरिबांना मिळणारी मदत दिली जात आहे.त्यामुळे सबका साथ सबका विकास घेऊन केंद्र सरकार काम करत असल्याचे मत आमदार गिरीश महाजन यांनी मांडले. जामनेर तालुक्यातील दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड देण्यासाठी तहसीलदार पुरवठा अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी प्रयत्न करून दिव्यांग बांधवांना रेशन कार्ड देण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते.
तहसीलदार अरुण शेवाळे व पुरवठा अधिकारी विठ्ठल काकडे यांनी लाभार्थ्यांची निवड करून दि. ९ रोजी अंत्योदय योजनेअंतर्गत आमदार गिरीश महाजन व तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या हस्ते ७७ दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड वाटप करण्यात आले. त्याच बरोबर शासनाच्या कुटुंब अर्थ सहाय्य योजने अंतर्गत २० लाभार्थ्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये प्रमाणे धनादेश वाटप करण्यात आला. जर अधिकारी चांगले राहिले तर नक्कीच चांगले काम होते. हे उदाहरण आता आपल्यासमोर आले आहे. त्याचबरोबर शासनस्तरावर सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार तत्पर आहे अशी ग्वाही महाजन यांनी यावेळी बोलताना दिली.
यावेळी पुरवठा अधिकारी विठ्ठल काकडे, प्रा. शरद पाटील, अशोक पाटील, तुकाराम निकम, दिव्यांगाचे प्रतिनिधी रवींद्र झाल्टे, पवन माळी, पुरवठा विभागाचे गणेश राजपूत नेरकर, रघुनाथ पवार आदी यावेळी उपस्थित होते.