धक्कादायक! एका उंदरामुळे चिपळूणमधील सिद्धीला गमवावा लागला जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – आजपर्यंत आपण सर्पदंशाने (snake bites) काही लोकांचा जीव गेल्याचे आपण पहिले किंवा ऐकले असेल. अशीच एक मन हेलावून टाकणरी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील घोणसरे या ठिकाणी घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
मृत मुलीचे नाव सिद्धी चव्हाण आहे. ती 11 वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. हाती आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सिद्धी हि आपल्या घरी झोपली होती. यावेळी एका उंदराचा पाठलाग करत एक साप (snake bites) घरात शिरला. यानंतर घरात शिरलेल्या सापाने झोपेत असलेल्या सिद्धी चव्हाण हिला 3 वेळा दंश (snake bites) केला. यानंतर सिद्धी चव्हाणला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यामुळे सिद्धी चव्हाणचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

यवतमाळमध्येही सर्पदंशाने मुलीचा झोपेतच मृत्यू
यवतमाळमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. दसऱ्याच्या दिवशी सोने लूटून दमलेली एक मुलगी घरी आल्यावर झोपली. मात्र, रात्री झोपलेल्या अवस्थेत तिला सापाने दंश (snake bites) केला. आणि याचाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. वैष्णवी भुरवले असे या मुलीचे नाव आहे. ही इयत्ता 7वी ची विद्यार्थिनी होती.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय