धक्कादायक !!! भर दिवसा मुलीची गोळी घालून हत्या

Gun shoot
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेगवेगळ्या कारणांनी देशात मुलींवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. कठोर कायदे करून सुद्धा विविध कारणांनी मुलींवर हल्ले होतच आहेत. त्यातल्या त्यात उत्तर प्रदेश या भाजपच्या राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना एका मुलीची भर दिवसा गोळी घालून हत्या केली.

निकिता तोमर असं नाव असणारी ही मुलगी कॉलेजात शिकत होती. वल्लभ वल्लभ गड मधील अग्रवाल कॉलेजमध्ये ती शेवटच्या वर्षाच्या परीक्षा देण्यासाठी कॉलेजात गेलेली होती. गुन्हेगार असणारा मुलगा तिच्या मागे गेल्या अनेक दिवसांपासून फिरत असल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली पण काही दिवसा पासून त्याने तिच्या मागे फिरणे बंदही केले होते. आणि अचानक त्याने तिची हत्या केल्याचे समजताच तिच्या आई-वडिलांना धक्का बसला.

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले. त्यात एका कार मधून दोन युवक रस्त्यावर मुलीला थांबून तिला गाडीत ओढण्याचा प्रयत्न करीत असताना ती प्रतिकार केल्याचे दिसत आहे. ती गाडीत येत नसल्याचे दिसताच त्यांने तिच्यावर गोळ्या झाल्या. तिच्या डोक्याला गोळी लागली होती. दवाखान्यात गेल्यानंतर तिचा मृत्यू झाला.

घटना समजताच पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही ॅमेर्‍याच्या मदतीने गुन्हेगारांना अवघ्या पाच तासात पकडले. गुन्हेगार पोलिसांपासून पळत दुसऱ्या शहराच्या दिशेने जात होते. आरोपीचे नाव तोसिफ असून पोलिसांनी याच्यावर सक्त कारवाई केली जाईल अशी माहिती दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’