मित्रासोबत दिल्लीत आलेल्या मुलीवर रिक्षाचालकाकडून बलात्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी दिल्ली रेल्वे स्टेशन पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली बिहारमधून एका 32 वर्षीय रिक्षाचालकाला अटक केली आहे. या रिक्षाचालकावर मुलीला आमिष दाखवून घरी नेऊन तिच्यावर बलात्कार आणि चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

ही घटना 27 ऑगस्ट रोजी घडली आहे. पीडित मुलगी बिहारमधील पूर्णिया येथून आपल्या मित्रासोबत दिल्लीला आली होती. यावेळी ऑटो चालकाने पीडितेला फूस लावून त्याच्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपीने पीडितेला नोकरीचे आश्वासन दिले होते. पीडितेने आपल्या तक्रारीत म्हंटले कि, तिच्यावर फक्त बलात्कारच झाला नाही तर आरोपीच्या साथीदाराने आपली लुटमारदेखील केली आहे.

यानंतर पोलिसांनी या पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपी रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. पीडित मुलगी मित्रासह बिहारहून आली होती. यानंतर त्यांची ऑटो चालकाशी बातचीत झाली. यानंतर आरोपीने मुलीला आपल्या वासनेचा बळी बनवले. यानंतर पोलिसांनी आरोपीला बिहारमधून अटक केली आहे. या घटनेनंतर आरोपी त्याच्या गावी गेला होता आणि लपून बसला होता, त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत त्याच्या गावात पोहोचले आणि त्याला अटक आहे.

Leave a Comment