मुलांच्या ‘या’ गोष्टींवर मुली होतात सर्वाधिक आकर्षित; पहा कोणत्या आहेत त्या…

Girls impression Boy
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समाजात वावरत असताना आपलं व्यक्तिमत्व आकर्षक आणि उठून दिसण्यासाठी प्रत्येकजण खूप प्रयत्न करतात. कोणावरही छाप पाडण्यासाठी व्यक्तिमत्त्वाची भूमिका खूप महत्त्वाची असते. कारण फर्स्ट इंम्प्रेशन खूप महत्वाचे असते. अशा काही गोष्टी आहेत कि त्यामुळे स्त्री आणि पुरुष एकमेकांकडे आकर्षित होतात. मुलांच्या कोणत्या गोष्टींकडे मुली सर्वात आधी आकर्षित होतात हे आपण पाहूया…

ट्रिम दाढी असलेले मुलं

मुलींना आजच्या जमण्यात अधिक फॅशनेबल मुले आवडतात. ते सुद्धा ट्रिम दाढी असलेले. कारण आजकाल ट्रिम्ड बियर्डचा ट्रेंड खूप जास्त वाढलेला आहे. या ट्रेंडमुळे आजकाल अनेक तरुण छोटी छोटी दाढी ठेवत आहेत. ज्या मुलांची दाढी फार मोठी किंवा लहान नसते अशा मुलांकडे मुली लगेच आकर्षित होतात. पुरुषांना अधिक मॅच्युर आणि माचो दिसण्यासाठी दाढी मदत करत असते. दाढी असलेला लुक कॅरी करणार्‍या मुलांना, पुरुषांना लोक जास्त मॅच्युर समजतात. कारण आजच्या काळात बहुतेक मुले किंवा तरुणांना दाढी ठेवून स्टाईलिश लुक ठेवायला आवडते.

वयाने जास्त असणारे तरुण

मुली अनेकदा लग्न असो अथवा प्रेम करण्यासाठी त्यांच्या वयापेक्षा मोठे असलेल्या तरुणांना अधिक प्राधान्य देतात. 2010 मध्ये असाच एक अभ्यास करण्यात आला होता. त्या अभ्यासानुसार, बहुतांश मुली अथवा स्त्रियाआपल्यापेक्षा वयाने जास्त असलेली मुले, पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात. कारण वयाने मोठ्या असण्यासोबतच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या महिला जीवनात स्थिर पुरुषांना अधिक प्राधान्य देतात.

शारीरिकदृष्ट्या फीट असणारे तरुण

मुलींना अथवा स्त्रियांना खास करून चांगली आणि पिळदार शरीरयष्टी असणारे तरुण आकर्षित करत असतात. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अभ्यासानुसार महिलांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त पुरुष जास्त आवडतात. परंतु स्त्रियांना खूप हेवी मसल्स असलेल्या पुरुषांशी महिलांचे दीर्घकालीन संबंध दिसत नाहीत.

महागडे परफ्यूम वापरणारी मुले

ज्या प्रमाणे आपण चांगले दिसत असलो आणि चांगले कपडे खालच्या असलो तरी आपल्या भोवती एखाद्याला आकर्षित करण्यासाठी अनेक गोष्टी करू शकतो. मुलीच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास चांगले आणि महागडे परफ्यूम वापरणारी मुले अधिक मुलींना आवडतात. आणि त्याच्याकडे आकर्षित करतात. जे पुरुष, मुले डिओ किंवा परफ्यूम वापरतात ते स्वत:ला आत्मविश्वासाने प्रेझेंट करतात आणि मुली. महिलाही त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतात.

स्वच्छता आणि नीटनेटकेपणा जपणारी मुले

तसे पाहिले तर मुलींना अथवा महिलांना पुरुषांतील अथवा आपल्या जोडीदारातील काय आवडेल हे सांगणे कठीणच. कारण प्रेम हे आंधळं असते. मात्र, ते डोळे उघडे ठेऊन आजकालच्या काही मुले-मुली करतात. काही मुली अथवा मुले आपला जोडीदार कसा हवा आहे यापेक्षा तो अथवा ती कसा राहतो, राहते याला काही प्रमाणात प्राधान्य देतात. दिसण्यासोबतच स्वच्छतेची काळजी घेणारे मुलं मुलींना जास्त करून आवडतात. अनेक अभ्यासांमध्ये असे म्हटले आहे की, चांगले दिसणे आणि ड्रेसिंग सेन्स व्यतिरिक्त जी मुलं स्वच्छतेला देखील महत्त्व देतात त्यांच्याकडे मुली आकर्षित होतात.