संतापजनक ! आंतरजातीय विवाह केल्याने जन्मदात्यांनीच केला मुलीचा खून

0
45
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
अहमदनगर प्रतिनिधी |मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे पालकांनीच पोटच्या मुलीची हत्या केलाचा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यातील कौठा गावात घडला. आई -वडिलांनी मुलीला ठार मारुन मृतदेह जाळून टाकलाय. आई-वडिलांविरुद्ध सोनई पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्रतिभा कोठावले असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचा पती देवेंद्र कोठावले (रा. संगमनेर) याच्या फिर्यादीवरून ब्रह्मदेव रमाजी मरकड व आई आशा मरकड या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलाय.
मुलगा परजातीचा असल्याने मुलीच्या घरच्यांनी लग्नास विरोध केला. मात्र दोघांनी पळून जाऊन संगमनेरमध्येविवाह केला होता. त्यानंतर काही दिवसांनी आई-वडीलांनी प्रतिभाशी संपर्क साधून देवेंद्र यांच्याशी पुन्हा लग्न करून देऊ, असे सांगून गावाकडे बोलवून घेतले.
त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. पती देवेंद्र याने प्रतिभाच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाहीये. त्यानंतर देवेंद्रने मुलीचे गाव गाठले. त्यावेळी मरकड यांनी मुलीचा हार्ट अ‍ॅटकने निधन झाले असून घरीच अंत्यविधी केला, असे सांगण्यात आले. त्यानंतर देवेंद्रने सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केलीये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here