हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपात अटकेत असलेल्या स्वामी चिन्मयानंदला अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, या प्रकरणात न्यायालयाने चिन्मयानंदला जामीन मजूर करतांना पीडित विद्यार्थिनीच्या वागण्यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयानं आपल्या सुनावणीत म्हटलं आहे,” एक मुलगी जिचे कौमार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. अशा वेळी या घटनेबाबत ही ही मुलगी आपल्या पालकांशी किंवा न्यायालयासमोर एक शब्द सुद्धा बोलत नाही हे सर्व आश्चर्यचकित करणार आहे असं निरीक्षण न्यायालयानं या खटल्यात नोंदवलं आहे.
हा खटल्यावर न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यापासून पीडित मुलगी आपली बाजू मांडताना एक शब्द सुद्धा आत्तापर्यंत बोलली नाही आहे. हीच गोष्ट विचारात धरत अखेर या प्रकरणातील आरोपी चिन्मयानंद याला पाच महिन्यांनंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.