औरंगाबाद शहराचे जीआयएस मॅपिंग पूर्ण

औरंगाबाद – औरंगाबाद शहरातील मालमत्तांची मोजणी करण्यासाठी जीआयएस (जिऑग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम) या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून झोन क्रमांक 9 चे मॅपिंग प्रायोगिक तत्त्वावर पूर्ण झाल्यानंतर आता बाकी आठही झोनचे काम पूर्ण झाले आहे. आता पुढच्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वे ला सुरुवात करण्यात येईल, असे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले आहे.

गेल्या चार महिन्यांपासून या कामाचे नियोजन सुरू असून गुजरातच्या एमएक्स इन्फो कंपनीला काम दिले होते. त्यासाठी स्मार्ट सिटी च्या माध्यमातून 10 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. ड्रोन द्वारे काढलेल्या सर्व फोटोची सॅटॅलाइट इमेज सोबत पडताळणी करणार आहे. शहराचा एकूण परिसर हा 170 चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी 135 चौरस किलोमीटर जागेचे ड्रोनद्वारे फोटो काढले आहेत. शहरात सध्या पाच लाखांपेक्षा अधिक घरे असतील त्यापैकी 2 लाख 50 हजार मालमत्तांची मनपाकडे नोंद आहे. दोन लाख मालमत्ताधारक कर भरत असल्याचे देखील समोर आले आहे. ज्या मालमत्तांना कर आकारलेला नाही त्यांना कर आकारणार आहे. प्रत्यक्ष घरोघरी जाऊन देखील सर्वे होणार आहे.

पुढच्या टप्प्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार असून यासाठी एक स्वतंत्र फॉर्म तयार केला आहे. हा फॉर्म शहरात वितरित केला जाणार आहे. हा फॉर्म मनपाचे कंत्राटी कर्मचारी व कर्मचारी भरून जमा करणार आहे. त्यात विद्युत मीटर क्रमांक, आधार कार्ड, पॅन नंबर, घराच्या नळकनेक्शन ची नोंद केली जाईल.a

You might also like