हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 8 मे आहे. यादिवशी जगभरात मातृदिन म्हणजेच मदर्स डे (Mother’s Day) साजरा केला जात आहे. आईचा सन्मान करण्यासाठी मदर्स डे साजरा केला जातो. आपली आई आयुष्यभर आपल्या कुटुंबाची देखभाल करते. मात्र ती स्वतःकडे लक्ष देण्यास विसरते. आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करताना, काही काळानंतर तिलाही आधाराची गरज असते. त्यामुळे मदर्स डेच्या दिवशी आपल्या आईला आर्थिकदृष्ट्या मजबूत करून तिला चांगल्या आयुष्याची भेट देणे आवश्यक आहे.
आपण सर्वजण भविष्याच्या आर्थिक बळासाठी अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करतो. सध्या अशा काही योजना देखील आहेत ज्यामध्ये थोडे पैसे जमा करून आपल्या आईला मोठा आधार देता येईल. चला तर मग अशाच काही योजनांबद्दल जाणून घेऊयात…
हेल्थ इन्शुरन्स
वृद्धापकाळात वैद्यकीय गरजा वाढतात. महागाईच्या काळात आजारपणाचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा झाला आहे. अशा परिस्थितीत तुमच्या पालकांसाठी मेडिकल इन्शुरन्स हा एक मोठा आधार आहे. तुमच्या आईचा मेडिकल इन्शुरन्स नसेल तर लगेच काढून घ्या. किमान 5 ते 7 लाख रुपयांचा मेडिकल इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. Mother’s Day
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही 60 वर्षांवरील लोकांसाठी असलेली सरकारी बचत योजना आहे. जी अवघ्या 5 वर्षांत मॅच्युर होते. मॅच्युरिटीनंतर ती आणखी 3 वर्षांसाठी वाढवता येते. या खात्यावर इतर योजनांपेक्षा जास्त व्याज मिळते. या योजनेअंतर्गत बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येईल. अनेक ज्येष्ठ नागरिक बचत योजनांवर मेडिकल आणि पर्सनल ऍक्सिडेंटल इन्शुरन्स आणि इतर स्पेशल ऑफर देखील उपलब्ध आहेत. Mother’s Day
सॉव्हरेन गोल्ड बाँड्समध्ये गुंतवणूक
कारण बहुतेक महिलांना सोन्यात रस असतो. मात्र आजच्या महागाईच्या काळात फिजिकल गोल्डऐवजी तुम्ही आईला डिजिटल गोल्ड भेट देऊ शकता. यासाठी, तुम्ही सॉव्हरेन गोल्ड बाँड्स (SGB) मध्ये गुंतवणूक करून आईला एक बाँड भेट देऊ शकता.
एमर्जन्सी फंड
पालकांसाठी एमर्जन्सी फंडही ठेवला पाहिजे. यामध्ये पालकांच्या मासिक खर्चानुसार किमान तीन महिन्यांचा फंड असावा. हा फंड बचत खात्यात किंवा FD च्या स्वरूपातही असू शकतो. कारण ही अशी माध्यमे आहेत जी आणीबाणीच्या वेळी लगेच वापरता येतात. Mother’s Day
हे ही वाचा : Investment Tips : चांगल्या भविष्यासाठी ‘अशा’ प्रकारे करा पैशांची गुंतवणूक