हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत असून कोरोना प्रतिबंधक लसीचा आलेला साठा दोन दिवसात संपेल. देशातील 50 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पाकिस्तानला लस देण्यापेक्षा, महाराष्ट्राला लस द्यावी, अशी मागणी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.
राज्यात कोरोनाची स्थिती भीषण आहे. त्यामुळेच मी तीन आठवड्यांच्या कडक लॅाकडाऊनची मागणी केली आहे. आज याच विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व पक्षांची चर्चा केली जाणार आहे,” अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
दरम्यान राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून लस उपलब्ध नसल्याने ठिकठिकाणी लसीकरण थांबले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार मध्ये आरोप – प्रत्यारोप देखील झाले होते.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group