‘माझ्या विकासाच्या स्वप्नाला साथ द्या’ – आदित्य ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । मुंबईमध्ये कोल्हापूर भवनाची उभारणी करणार आणि पहिल्याच वर्षी रखडलेला आजरा तालुक्यातील आंबेओहळ प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गडहिंग्लज येथे केली. येथील म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या प्रांगणात शिवसेनेचे कागल विधासभेचे उमेदवार संजय घाटगे आणि चंदगड विधानसभेचे उमेदवार संग्रामसिंह कुपेकर यांच्या एकत्रित प्रचाराचा शुभारंभ ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना ठाकरे यांनी ‘माझे साथी आणि सोबती’ म्हणून दोघांना निवडून विधानसभेत पाठवा असे आवाहन उपस्थितांना केले.

कोल्हापूर हा माझा आवडता जिल्हा असल्याने मी नेहमीच येत राहणार’ असल्याचे सांगत ठाकरे यांनी लोकांच्या सेवेसाठी या रणांगणात उतरलो असून पूर्ण महाराष्ट्र ताब्यात द्या. तरच त्याला पुढे नेता येईल असे आवाहन केले. शिवाय ‘ही महायुती वचन पूर्ण करणारी असून सर्वसामान्यांचा आवाज विधानसभेत पोहचविण्याची हीच संधी’ असल्याचे ठाकरे यांनी म्हंटले.

”मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोणते स्वप्न बघत नसून संपुर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बनवताना पूर्ण भगवा बनवण्यासाठी हे स्वप्न आहे. बेरोजगारी, गरीबी संपवून महिला सबलीकरणासह उद्योगधंदे वाढविण्यासाठी जे प्रेम आणि आशीर्वाद लोकांचे शिवसेनेला आहेत ते मतपेटीपर्यंत पोहचवा” अशी भावनिक साद ठाकरे यांनी उपस्थितांना घातली. यावेळी खासदार संजय मंडलिक, संग्राम कुपेकर, संजय घाटगे आदींनीही मनोगत व्यक्त केले.

इतर काही बातम्या-