लोणंद प्रतिनिधी ।सुशिल गायकवाड
कामगारांच्या अनेक विषयांवर आवाज उठविणारे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन नारायण राणे यांनी सातारा जिल्ह्यातील शिरवळच्या एमआयडीसी मध्ये पळशी (ता.खंडाळा) येथील हद्दीत असलेल्या छेडा इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भेट दिली. यावेळी येथील स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी मांडत असताना प्रामुख्याने स्थानिक लोकांना नोकरी मध्ये प्राधान्य देण्यात यावे.छेडा इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या प्रशासनासमोर स्थानिकांचा विषय मांडलेला असून कंपनीतील अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावलेले आहेत.
तुमच्या सारखी जी लोकं असतात ना ती मालकांना समजावून सांगत नाही.तुम्ही घाबरता तुमच्या नोकऱ्या टिकविण्यासाठी, तुम्हाला भूमिपुत्रांची मराठी कामगारांची काहीच पडलेली नसते.एच.आर. मॅनेजर म्हणून ही कामे तुमची आहेत.तुम्हांला स्थानिकांच्या प्रश्नावर काही करता येत नसेल तर राजीनामे द्या असा दम ही मनसे स्टाईलने एच. आर. मॅनेजर यांना दिलेला आहे. अक्कल आणि ताकत दोन्ही लावतो, असे म्हणूनगजानन राणे यांनी पुढच्या आठवड्यात विजय छेडा यांच्या सोबत मिटिंग करायची आहे. मी स्वतः इथे असणार आहे, नाहीतर राजीनामा टाकून निघून जायचे.
असा ही इशारा त्यांनी दिलेला आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहचिटणीस अश्विन गोळे, उपाध्यक्ष मितेश खाडे, सहचिटणीस अंकुश जाधव, नितीन पार्टे, राजेंद्र कोळी, अविष्कार भरगुडे, अभिजीत घोरपडे, प्रतीक राणे इत्यादी प्रमुख पदाधिकारी तसेच कामगार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा