राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांच्या अडचणी वाढणार? ‘न्याय द्या! अन्यथा 5 दिवसाच्या आत आत्महत्या करणार’; पीडितेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे. मेहबूब शेख यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. कालांतराने हे प्रकरण शांत झाले होते. मात्र आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह पीडित तरुणीने राज्य सरकार आणि गृहखात्याला कडक इशारा दिला आहे. मेहबूब शेख यांनाअटक करा अन्यथा मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा पीडित तरुणीने सरकारला दिला आहे.

”मला न्याय मिळाला नाही तर 5 दिवसांच्या आत आत्महत्या करणार असून माझ्या आत्महत्येला मेहबूब शेख जबाबदार असतील, असंही तिने म्हटलंय. त्यामुळे मेहबूब शेख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आणि पीडित तरुणीने पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी संबंधित तरुणीने राज्य सरकार आणि गृहखात्याला इशारा दिला आहे.

दरम्यान, तृप्ती देसाई यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. गुन्हा दाखल होऊन सव्वा महिना उलटला पण अद्याप आरोपीला अटक नाही. मेहबूब शेख यांनी पीडित तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून बलात्कार केलाय. अशावेळी सर्वसामान्य लोक आणि सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी, मंत्र्यांसाठी कायदा समान नाही का? असा सवाल देसाई यांनी विचारला आहे. न्याय मिळाला नाही तर पीडित तरुणीने आत्महत्या करणार असल्याचं म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पीडितेला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मुलीने काही बरं वाईट केलं तर त्याला मेहबूब शेख जबाबदार असतील, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

Leave a Comment