मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून राज्यात कडक संचारबंदी लागू केली आहे. यातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. तसेच छोटे व्यवसायिक,गरीब यांच्याकरिता आर्थिक पॅकेज ही जाहीर करण्यात आले आहे. मात्र या बरोबरच इतर काही घटकांचा पॅकेजमध्ये समाविष्ट करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी घोषित केली आहे. त्याचं काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत आहे. लोकांचे जीव वाचवणं ही आपली प्राथमिकता असून त्यासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे सरकार बरोबर उभा आहे महा विकास आघाडीच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार संचारबंदी कालावधीसाठी छोट्या व्यावसायिकांना करिता पॅकेज जाहीर केले आहेत पण या पॅकेजमध्ये आणखी काही घटकांचा समावेश करणं गरजेचं आहे. त्यासाठी काँग्रेसची भूमिका आग्रही असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. त्यामध्ये शेतकरी सलून चालक, फुल विक्रेते टॅक्सीचालक, मासळी विक्रेते, मुंबईचे डबेवाले यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे.
तसंच त्यांनी पुढे म्हटले आहे की, संचार बंदी च्या कालावधीमध्ये भाजीपाला,फळ बागायती व फुलांच्या शेती व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तसेच सलूनचे दुकान बंद असल्याने या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. धार्मिक स्थळांवर बंदी असल्याने फुलं विक्रेत्यांवर ही उपासमारीची वेळ येईल शिवाय मुंबईतील महत्त्वाचा घटक असलेल्या डबेवाल्यांचा ही या पॅकेजमध्ये समावेश करून या घटकांना लाभ घ्यावा असं पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group