हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ठाकरे सरकारने आमदारांना मुंबईत घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावरून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत तर काही आमदारांनी घरे घेण्यास नकारही दिला आहे. त्याच पाश्वभूमीवर भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी फेसबुक वर एक फोटो पोस्ट करत सरकारने गरजुंना घरे द्यावीत अशी मागणी केली आहे.
परळला टाटा हॉस्पिटला कॅन्सर ट्रीटमेंटसाठी सबंध भारतातून लोकं येतात! ट्रीटमेंट तीन – तीन महिने चालते. अशामध्ये नातेवाईक आणि रुग्णाला राहण्याची गैरसोय होते. अक्षरशः फुटपाथ वर त्यांना तीन – तीन महिने रहाव लागते. मी सरकारला विनंती करेल की, आपण आमदारांना घरे देण्याऐवजी या गरजू व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. अशी पोस्ट खोत यांनी केलीय.
दरम्यान आमदारांना घरे देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हि घरे मोफत नाहीत , त्यासाठी आमदारांना खर्च द्यावा लागणार आहे असे स्पष्टीकरण दिले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी मात्र मला सरकारी घर नको, अशी भूमिका घेतली. तसंच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनीही अशीच भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होतंय.