“जयंत पाटलांचे आयुष्यच कारस्थाने करण्यातच गेले”; गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह आमदार सदाभाऊ खोत हे आक्रमक झाले आहेत. लोकार्पण करण्यासाठी निघालेल्या पडळकर व खोत यांना पोलिसांनी अडवले असल्याने यावरून पडलकरांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. जयंत पाटील यांचे हे कारस्थान असून त्यांचे आयुष्यच कारस्थाने करण्यात गेले आहार, अशी टीका पडळकर यांनी केली.

सांगली येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळा करण्यासाठी पडळकर व खोत निघाले असता त्यांना पोलिसांनी अडवले. यावेळी पडळकर यांनी पोलिसांची चर्चा केली तसेच शांततेच्या मार्गाने लोकार्पण करू देण्याचे सांगितले. यावेळी पडळकरांनी माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, आमच्या मेंढपाळांच्या हस्ते लोकार्पण पार पडणार आहे. मात्र अशा मेंढपाळांना सरकार विरोध करून पद मोठी मनं छोटी याचे दर्शन घडवत आहेत.

आम्ही पोलिसांना घाबरणार नाही, पोलिसांनी अडवूनही एवढे लोक याठिकाणी पोहोचले, हे उद्घाटन महाराष्ट्र बघेल. मात्र, आम्हाला अडवणे हि कारस्थाने पालकमंत्री जयंत पाटील यांची आहे. त्यांचे आयुष्य याच्यात गेले. त्यामुळे त्यांना उद्घाटनाला बोलवणार नाही, आमचे लोक आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करतो, असे पडळकर यांनी म्हंटले.

आज सांगली येथे अहिल्यादेवी स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमावरून शरद पवारांवर हल्लाबोल केला. “शरद पवार यांच्याहस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आम्ही ते करू देणार नाही, असे पडळकर यांनी म्हंटले आहे.

 

Leave a Comment