नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येक शिक्षक मुलांना एखादा कठीण विषय शिकवताना प्रात्यक्षिके करून दाखवतात. ज्यामुळे तो विषय विद्यार्थ्यांना समजायला सोपा जातो. हे बहुतेक वेळा भौतिकशास्त्र तासादरम्यान जास्त पाहिले जाते. या संदर्भातील एका शिक्षकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये एक शिक्षक विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्राचा एक धडा शिकवत आहे. ज्यामध्ये तो काच आणि हवेचा अपवर्तक निर्देशांक दाखवत असताना एक अशी जादू करतो कि सगळे विद्यार्थी बघतच राहतात. या शिक्षकाने शिकवता शिकवता जादू करून त्याच्यासमोरील विद्यार्थीच नाही तर सोशल मीडियावर (Viral Video) कित्येक नेटिझन्सचे मन जिंकले आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता शिक्षकाच्या हातात दोन काचेचे ग्लास आहेत. एक ग्लास छोटा आणि एक ग्लास मोठा आहे. शिक्षक मोठ्या ग्लासच्या आत छोटा ग्लास ठेवतात आणि विद्यार्थ्यांना ग्लासच्या आतील ग्लास दिसतो का, असं विचारतात. यावेळी ग्लासच्या आतील ग्लास स्पष्टपणे दिसतो. त्यानंतर या दोन्ही ग्लासमध्ये ते तेल ओतात आणि अरे व्वा… हा काय चमत्कार… ग्लासच्या आतील ग्लास चक्क गायब होतो. पाहता पाहता ग्लास काही सेकंदातच दिसेनासा होतो. हा चमत्कार नेमका कसा झाला, असं का घडलं यामागील लॉजिकही शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात आणि त्याचे स्पष्टीकरणदेखील हे शिक्षक (Viral Video) देताना दिसत आहे.
He is a real hardcore teacher and not the ones who just want to shine speaking English. pic.twitter.com/BMj2zAIEog
— Deepak Prabhu (@ragiing_bull) November 8, 2022
हा व्हिडीओ (Viral Video) दिपक प्रभू यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. सध्या तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. फक्त इंग्रजी बोलून चमकणारा नव्हे तर हा एक हाडाचा शिक्षक आहे, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या शिक्षकाची शिकवण्याची पद्धत पाहून सगळ्यांनी त्याचे कौतुक केले आहे.
हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?