हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गोवा म्हणलं की, आठवतो तो बीच, ऐतिहासिक वारसा. तसेच फिरायला जायला म्हणलं की, गोवा हा शब्द सर्वांच्या तोंडी येतो. मग तो व्यक्ती लहान असो की मोठा. प्रत्येकाला गोव्याला जाण्याची हौस असते. काही जणांचे तर स्वप्न असते गोव्याला जाण्याचे. तसेच ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण गोव्याला जातात. परंतु यावेळी जर तुम्ही गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला तुमच्या खिशातून अधिकचे पैसे भरावे लागणार आहेत. कारण गोव्याला जाण्याचे तिकीट महागले आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.
17 टक्क्यांनी महागला विमान प्रवास
दरवर्षी या सीजन मध्ये देश – विदेशातून अनेक पर्यटक गोव्याला येतात. त्यामुळे हॉटेल, विमान प्रवास तसेच बस प्रवास यांच्या तिकीट दरात वाढ होते. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा तब्बल 17 टक्क्यांनी विमान प्रवास हा महागला आहे. त्यामुळे प्रवाश्यांना त्याचा फटका बसणार आहे. मात्र असे जरी असले तरी देशांतर्गत असलेला विमान प्रवास हा स्वस्त झाला आहे.
28 टक्क्यांची झाली घट
देशांतर्गत होणारा विमान प्रवास हा 28 टक्क्यांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे ही प्रवाश्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विमान कंपन्यांनी दिल्ली ते मुंबई, मुंबई ते बेंगळूरू तसेच मुंबई ते चेन्नईच्या तिकीट दरात 24 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये ही घट केली आहे. त्यामुळे याचा फायदा नक्कीच प्रवाश्यांना होणार आहे.
तर दिल्ली – बेंगळूरू, दिल्ली – श्रीनगर सोबतच गोव्याचा विमान प्रवास महागला आहे. दिल्ली ते गोवा, मुंबई ते गोवा,दिल्ली ते बेंगळूरू, दिल्ली ते श्रीनगर यां मार्गांवरील तिकीट दरात वाढ झाली आहे. तर मुंबई ते चेन्नई, मुंबई ते बेंगळूरू, मुंबई ते डेहराडून, दिल्ली ते हैदराबाद,दिल्ली ते मुंबई यां मार्गांवरील तिकीट दरात घट झाली आहे.
कसे आहेत विमानाचे दर?
मार्ग 2022 ते 23 मधील ही वाढ असून दिल्ली ते गोवा विमा तिकीट मागील वर्षी 6950 रुपये होते ते आता 8100 रुपये झालं आहे, म्हणजेच यामध्ये 17.01 % वाढ झाली आहे. त्यानंतर मुंबई ते गोवा तिकीट आधी 4080 रुपये होते ते आता 4580 रुपये झालं आहे म्हणजेच यामध्ये 12.03 % वाढ झाली आहे. दिल्ली ते बेंगळूरू तिकीट यापूर्वी 7602 रुपये होते ते आता 7823 रुपये झालं आहे म्हणजेच यात 2.19 % नि वाढ झाली आहे. तर दिल्ली ते श्रीनगर विमान दर आधी 5963 रुपये होता तो आता 6062 रूपये झाला आहे म्हणजेच यामध्ये +1.66 % एवढी वाढ झाली आहे.
कोणती तिकिटे स्वस्त झाली –
मुंबई ते चेन्नई विमान तिकीट आधी 5431 रुपये होती ती आता 3889 रुपये झाली आहे. म्हणजेच यामध्ये तब्बल 28.04 % एवढी तिकीट दरात घट झाली आहे. मुंबई ते बेंगळूरू आधी 6133 रुपये तिकीट होते ते आता 4662 रुपये झाली आहे म्हजेच यामध्ये 23.09 % दरात कपात झाली आहे. तर मुंबई ते डेहराडून 8250 वरून 7262 रुपये तिकीट झालं आहे, दिल्ली ते हैदराबाद 6642 वरून 5878 रुपये झालं आहे. त्यामुळे यां मार्गांवरील प्रवाश्यांना याचा चांगला फायदा होणार आहे.