गोव्यातील गुटखा किंग जगदीश जोशी यांचा मुलगा सचिन याला अटक, मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीनंतर ईडीने केली कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गोवा गुटखा किंग (Goa Guthkha King) ओळखले जाणारे उद्योजक जगदीश जोशी यांचा मुलगा सचिन जोशी (Sachin Joshi) याला प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. अटकेपूर्वी ईडीने सचिनची मुंबई शाखेत कित्येक तास चौकशी केली. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील रहिवासी असलेल्या सचिन जोशीला ओंकार बिल्डरशी संबंधित सुमारे 100 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. 7 तासांच्या चौकशी दरम्यान जेव्हा ईडीला सचिन योग्य माहिती देत ​​नसल्याचे आढळले तेव्हा त्याला औपचारिकरित्या अटक करण्यात आली.

सचिन जोशी याच्या अटकेनंतर ईडीच्या मुंबई शाखेजवळील पोलिस स्टेशन आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना याची माहिती देण्यात आली. सचिन जोशीला आज मुंबईतील स्थानिक न्यायालयात हजर केले जाईल, तेथे त्याचा रिमांड मागितला जाईल. रिमांड मिळाल्यावर घोटाळ्याप्रकरणी ईडी पुढील चौकशी करेल. ईडीनुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसंदर्भात फसव्या योजनेत सहभागी असलेल्या ओंकार बिल्डरचे मालक कमल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. चौकशीत सचिन जोशीबद्दल अत्यंत महत्त्वाचे पुरावे आणि स्टेटमेंट मिळाल्यानंतर त्याला रविवारी सायंकाळी अटक करण्यात आली.

सचिन जोशी यापूर्वीही वादात होता
सचिन जोशीने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांसोबतच अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांतही काम केले आहे. त्यांचे वडील जगदीश जोशी गोवा गुटखा किंग म्हणून ओळखले जातात. सचिन जोशी याने गेल्या वर्षी गोव्यातील फरार बिझनेसमॅन विजय मल्ल्याचा वादग्रस्त बंगला विकत घेतला होता. लिलावाच्या वेळी सचिन जोशीने त्या बंगल्यासाठी सुमारे 73 कोटी रुपये भरले होते. यानंतर सचिन जोशी यांचे नाव अतिशय वेगाने चर्चेत आले.

जगदीश जोशीही वादात सापडले आहेत
2001 मध्ये सचिन जोशी यांचे वडील जगदीश जोशी यांच्यावर मुलीच्या प्रियकराची हत्या केल्याचा आरोप होता. 2004 साली जगदीश जोशी यांचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ अनिस इब्राहिम यांच्याशी संबंधित होते. गुटख्याचा कारखाना बनवण्यासाठी अंडरवर्ल्ड मधून पैसे गुंतवले जायचे असा आरोप जगदीश जोशी यांच्यावर होता. यानंतर जगदीश जोशी यांच्यासह अनेक आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हादेखील दाखल करण्यात आला. मात्र अनेक वादात अडकल्यानंतर जगदीश जोशी यांना दिलासा मिळाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.