Goa Tourism | दक्षिण गोवा जिल्ह्यातील दाबोलीम विमानतळावर पहिल्या आंतरराष्ट्रीय चार्टर विमानाने अंदाजे 300 रशियन पर्यटकांचे आगमन झाले आहे. रशियन पर्यटकांच्या गोव्यातील आगमनाने येथील पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. काल सकाळी 05.30 वाजता हे विमान गोव्यात उतरले. दाबोलिम विमानतळ हे वास्को द गामा शहरापासून 4 किमी (2.5 मैल) दूर आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती राज्याच्या पर्यटन उद्योगासाठी एक आश्वासक चिन्ह मानलं जात आहे.
पर्यटनावरच आहे गोव्याची भिस्त – Goa Tourism
गोव्यात सध्या साथीच्या रोगांचे सावट असताना राज्य सरकारला आरोग्यदृष्ट्या सज्ज रहावे लागणार आहे. परदेशी पर्यटकांना गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याची भुरळ वर्षानुवर्षे आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पर्यटक पर्यटन, सुट्ट्या व्यतित करण्यासाठी प्रथम गोव्यालाच पसंती देतात. गोव्यातील समुद्रकिनारे आणि येथील संस्कृतीचे आकर्षण जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत असल्याचे दिसून आले आहे. परदेशी पर्यटक किनारपट्टीच्या नंदनवनाचा शोध घेण्यासाठी उत्सुक असतात. ते गोव्यातील विविध समुद्रकिनार्यांवर जाऊन शांततेचा शोध घेतात आपला वेळ मजेत घालवतात. गोवा राज्याची भिस्त पर्यटन (Goa Tourism) व्यवसायावर अवलंबून आहे.
दाबोलिम विमानतळ हे निसर्गरम्य सौंदर्याच्या सान्निध्यात असून बाजुला आलिशान व्हिला, शॉपिंग सेंटर्स, सुसज्ज मॉल्स, रुग्णालये, परवडणारे अपार्टमेंट्स अशा मुलभूत सोयी आहेत. त्यामुळे परदेशी पर्यटकांची (Goa Tourism) या परिसराला प्रथम पसंती असते. हे विमानतळ वाहतुकीच्या सर्व बाजुंनी योग्य आहे. हे भारतातील गोवा राज्याला सेवा देणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे भारतीय विमानतळ प्राधिकरणद्वारे हंसा नावाच्या भारतीय नौदलाच्या नौदल एअरबेसमध्ये सिव्हिल एन्क्लेव्ह म्हणून चालवले जाते. दाबोलिम विमानतळावरील वाढत्या पर्यटकांच्या गर्दीपासून मुक्त होण्यासाठी आणि पर्यटनवाढीसाठी गोवा राज्य आणि त्याच्या लगतच्या प्रदेशांना अधिक आंतरराष्ट्रीय स्थळांशी जोडण्यासाठी उत्तर गोवा जिल्ह्यातील मोपा येथे एक पर्यायी विमानतळ, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात आले आहे.
1955 मध्ये एस्टाडो दा इंडिया पोर्तुगेसा सरकारने 249 एकर (101 हेक्टर) जमिनीवर एरोपोर्टो डी दाबोलिम म्हणून विमानतळ बांधले होते. येथील प्रशासनाला पर्यटकांना दिलेल्या सेवेतून महसूल मिळतो. लँडिंग शुल्क प्रत्येकी ₹17,000 (US$210) आहे तर मार्ग नेव्हिगेशन सुविधा (RNF) शुल्क सुमारे ₹7,400 (US$93) आहे. गोव्यातील पर्यटन हंगामाला नोव्हेंबर आणि मे महिन्यात बहर असतो. रशियामधून गोव्याला येण्यासाठी तेथील सरकारने विशेष प्रवास सुविधा निर्माण केल्या आहेत. तसेच युरोपियन देशांमधूनही अनेक प्रवासी सविधा उपलब्ध आहेत.