दसऱ्याच्या मुहूर्तावर बिजवडी येथे शेळ्या-मेंढ्याचा बाजार सुरु

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस

दसऱ्याच्या मुहूर्तावर माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती विद्यमानाने बिजवडी (ता. माण) येथे शेळ्या मेंढ्यांच्या बाजाराची सुरुवात बाजार समिती सभापती विलासराव देशमुख, उपसभापती वैशाली विरकर, संचालक दत्तात्रय सस्ते, किसन सावंत, रवींद्र तुपे यांच्या शुभहस्ते करण्यात आली. खरेदी विक्री करणाऱ्या व्यापारी व शेतकऱ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर शेळ्या-मेंढ्यांच्या बाजार सुरू झाल्याने समाधान दिसत होते. बिजवडी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या बाजाराची सुरुवात मागेच होणं गरजेचं होतं. आज झालेली सुरुवात पाहून बिजवडीमध्ये चांगला प्रतिसाद मिळेल, अशी भावना आलेल्या व्यापारी वर्गाने व्यक्त केली.

यावेळी बाजार समितीचे सचिव रमेश जगदाळे, मामुशेठ विरकर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष एम. के. भोसले, माण तालुका काँग्रेस उपाध्यक्ष शिवाजीराव भोसले, विठ्ठलराव भोसले, चंद्रकांत दडस, शहाजी दडस, रोहिदास राऊत, शंकरराव बरकडे, किरण बरकडे, विकास निंबाळकर, जोतिराम जाधव, संदीप भोसले दिलीप आवळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन मार्केट कमिटी संचालक योगेश भोसले यांनी केले. प्रास्तविक डॉ. अजित दडस यांनी केले. आभार रावसाहेब देशमुख यांनी मानले.

You might also like