आता शेअर्सप्रमाणेच सोन्याची देखील खरेदी-विक्री करता येणार; कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आता आपल्याला शेअर्सप्रमाणेच सोन्याची देखील खरेदी आणि विक्री करता येईल. त्याचे ट्रेडिंग सोमवार ते शुक्रवार असेल. बाजार नियामक सेबीने नुकतेच यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या अंतर्गत, स्टॉक मार्केट इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स सेगमेंटमध्ये सकाळी 9 ते रात्री 11.55 पर्यंत ट्रेडिंग टाइम फ्रेम निश्चित करू शकतो.

भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (सेबी) ने आपल्या परिपत्रकात, शेअर बाजारातील EGR च्या ट्रेडिंगशी संबंधित विविध पैलू, ट्रान्सझॅक्शनवर आकारले जाणारे चार्ज, घाऊक सौदे, प्राईस कॅटेगिरी आणि इन्वेस्टर प्रोटेक्शन फंड अँड इन्वेस्टर सर्विस फंड निश्चित केला आहे.

सोने जमा केल्यावर इलेक्ट्रॉनिक रिसीट दिली जाईल
या परिपत्रकानुसार, गुंतवणूकदारांच्या हिताला बाधा पोहोचू नये म्हणून EGR ट्रान्सझॅक्शनवर स्टॉक एक्स्चेंजद्वारे आकारले जाणारे शुल्क वाजवी स्वरूपात ठेवणे ही एक्सचेंजची जबाबदारी असेल. सेबीने तयार केलेल्या गोल्ड एक्स्चेंजच्या ब्लू प्रिंटनुसार, फिजिकल गोल्ड जमा केल्यावर इलेक्ट्रॉनिक रिसीट दिली जाईल. या रिसीटचे गोल्ड एक्सचेंजवर ट्रेडिंग केले जाईल. ही इलेक्ट्रॉनिक रिसीट सबमिट करून फिजिकल गोल्डची डिलिव्हरी देखील घेता येते.

…अशाप्रकारे खुला झाला गोल्ड एक्सचेंज चालवण्याचा मार्ग
बाजार नियामकाने 28 सप्टेंबर 2021 रोजी गोल्ड एक्सचेंज SEBI विनियम 2021 च्या फ्रेमवर्कला मान्यता दिली. त्यानंतर EGR ला सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) अ‍ॅक्ट, 1956 अंतर्गत डिसेंबर 2021 मध्ये सिक्युरिटी म्हणून अधिसूचित करण्यात आले. यामुळे भारतात गोल्ड एक्सचेंज चालवण्याचा मार्ग मोकळा झाला. यानंतर, भारतातील गोल्ड एक्सचेंजच्या कामासाठी फ्रेमवर्क देखील जारी करण्यात आले.

EGR ट्रेडिंग बद्दल आणखी माहिती जाणून घ्या
या परिपत्रकात असे म्हटले गेले आहे की, स्टॉक एक्स्चेंज सकाळी 9:00 ते 11:30 pm/11:55 या वेळेत त्यांच्या ट्रेडिंगचे तास निश्चित करू शकतात.
सर्व स्टॉक एक्स्चेंज संयुक्तपणे ट्रेडिंग सुट्टीचा निर्णय घेतील. जर बाजार आंतरराष्ट्रीय स्तरावर खुले असतील तर एक्सचेंजेस संध्याकाळी 5:00 नंतर सेशन ट्रेडिंग करण्यास परवानगी देऊ शकतात.
प्री-ओपन सेशन सकाळी 8:45 ते सकाळी 9:00 पर्यंत 15 मिनिटांसाठी असेल. यामध्ये ऑर्डर एंट्री, ऑर्डर फेरफार, ऑर्डर रद्द करण्यासाठी 8 मिनिटे आणि ऑर्डर मॅचिंग आणि ट्रेडसाठी 4 मिनिटे दिली जातील. प्री-ओपन सेशन पासून उर्वरित 3 मिनिटे सामान्य बाजारपेठेतील ट्रांसमिशन सुविधेसाठी बफर कालावधी असेल.
ऑर्डर एंट्रीच्या शेवटच्या एका मिनिटात सत्र रँडमपणे बंद केले जाईल. याचा ऑर्डर एंट्रीच्या 7व्या ते 8व्या मिनिटाच्या दरम्यान कधीही ऑर्डर बंद केली जाईल.

Leave a Comment