हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सोन्याची आवड कोणाला नाही?? सर्वानाच सोनं हवंहवंस वाटत. त्यामुळे कितीही महाग असलं तरी अनेकजण सोने खरेदीला पसंती देतात. परंतू जर तुम्हाला कोणी म्हंटल कि जगात सोन्याचा सर्वात मोठा साठा सापडला आहे तर?? तुम्हीही खुश ना? होय, सोन्याचा सर्वात मोठा साठा सापडला आहे, परंतु तो भारतात नव्हे तर सौदी अरेबिया मध्ये… त्यामुळे संपूर्ण जगाला तेलाची निर्यात करणाऱ्या सौदी अरेबिया आता सोन्याच्या माध्यमातून मालामाल होणार आहे.
सौदी अरेबियातील मक्का शहरात सोन्याचा हा मोठा साठा सापडला आहे. सध्याच्या मन्सूरह मसारा सोन्याच्या खाणीपासून हा नवा साठा 100 किलोमीटर अंतरावर पसरलेला आहे. अरेबियाची खाण कंपनी मादेनने याबाबत माहिती देताना सांगितलं कि, मन्सौराह मसारा पासून 400 मीटर आणि खाली दोन रँडम ड्रिलिंग साइट्सवर घेतलेल्या नमुन्यांवरून 10.4 ग्रॅम प्रति टन (g/t) सोने आणि 20.6 g/t सोन्याचा उच्च दर्जाचा सोन्याचा साठा दिसून आला. 2024 मध्ये मन्सूरह मसाराभोवती अजून मोठ्या प्रमाणात ड्रिलिंग करण्यात येणार आहे.
मादेनचे सीईओ रॉबर्ट विल्ट यांनी सांगितले की, सोने आणि फॉस्फेटचे उत्पादन दुप्पट करण्याची कंपनीची योजना आहे. पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडाची 67 टक्के मालकी मॅडेनकडे आहे. जो राज्याचा $700 अब्ज सार्वभौम संपत्ती निधी आहे आणि आखाती देशातील सर्वात मोठा खाणकाम करणारा आहे. यापूर्वी २०२३ च्या जानेवारी मध्ये कंपनीने परदेशातील खाण मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी PIF सह संयुक्त उपक्रम, मनारा मिनरल्सची घोषणा केली होती. आता सोन्याचा साठा सापडल्यामुळे सौदी अरेबियाचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. तसेच येणाऱ्या काळात सौदी अरेबियाच्या श्रीमंतीत भर पडणार आहे.