Gold Investment : सोन्यामध्ये अशाप्रकारे गुंतवणूक करून मिळवा भरपूर पैसे !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Investment : गुंतवणूकीसाठी सोने हा एक उत्तम पर्याय मानला जातो. भारतातील सोन्याचे महत्त्व फक्त यावरूनच दिसून येते की, विवाहसोहळ्याच्या बजेटचा एक मोठा भाग सोन्याचे दागिने आणि कॉईन इत्यादींवर खर्च केला जातो. भारत हा जगातील दुसरा असा देश आहे जेथे सोन्याचा सर्वाधिक वापर केला जातो. सोने हे केवळ एक मौल्यवान धातूच नाही तर भारतातील लोकांसाठी एक शुभ धातु देखील आहे.

Sovereign Gold Bond Scheme opens: Big opportunity to buy gold at low prices  - The Retail Jeweller India

1. सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond)

सोन्यात गुंतवणूकीचे अनेक पर्याय असू शकतात जसे की, दागदागिने, सोन्याचे नाणी,गोल्ड बुलियंस इ. परंतु या सर्वांमधील सर्वोत्तम पर्याय म्हणजे सॉवरेन गोल्ड बाँड मानला जातो. या सरकारी योजनेच्या गुंतवणूकिची जोखीम खूपच कमी आहे तसेच आपण चिंता न करता चांगला परतावा देखील मिळवू शकता. रिझर्व्ह बँकेकडून सॉवरेन गोल्ड बॉन्ड जारी केले जातात, त्यामुळे त्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही अडचण नाही. सॉवरेन गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे आहे. सोन्याच्या किंमतीव्यतिरिक्त हे वार्षिक 2.5 टक्के निश्चित उत्पन्न देखील देते. Gold Investment

A Gold ETF Drive Through The Election And European Funds | ETF Trends

2. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (Gold ETF)

सोने खरेदी करण्याच्या सुविधेस Gold ETF म्हणतात. ही म्युच्युअल फंड योजना आहे. सोन्यातील गुंतवणूकीसाठी हा सर्वात स्वस्त पर्याय आहे. हे एक्सचेंज ट्रेडेड फंड आहेत जे स्टॉक एक्सचेंजवर विकत घेता येऊ शकतात. Gold ETF चा बेंचमार्क हा स्पॉट सोन्याचे भाव असल्याने आपण सोन्याच्या वास्तविक किंमतीच्या जवळपास ते खरेदी करू शकता. Gold ETF खरेदी करण्यासाठी आपल्याकडे ट्रेडिंग डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. यामध्ये युनिटमध्ये सोन्याची खरेदी केली जाते. विक्री केल्यावर तुम्हाला सोने मिळणार नाही परंतु त्या काळाच्या बाजार मूल्याइतकीच रक्कम मिळेल. Gold Investment

Gold mutual funds top chart with 23% returns in one year. Is it time to  invest? - The Economic Times

3. गोल्ड म्यूचुअल फंड (Gold Mutual Funds)

Gold ETFच्या तुलनेत गोल्ड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे आहे. आपण थेट ऑनलाइन मोडद्वारे किंवा त्याच्या वितरकांद्वारे गोल्ड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. दुसरीकडे,Gold ETF मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये AMC रिटर्न साठी Gold ETF मध्ये आपला कॉर्पस गुंतवते. याव्यतिरिक्त, गोल्ड म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना SIP द्वारे गुंतवणूक करण्यास परवानगी देतात. गोल्ड म्युच्युअल फंड ही ओपन-एण्डेड गुंतवणूक उत्पादने आहेत जी गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (Gold ETF) मध्ये गुंतवणूक करतात आणि त्यांचे नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू (NAV) ETFs च्या कामगिरीशी जोडलेले आहेत. Gold Investment

The Gold ETF Market May Still Have Legs | ETF Trends

4. पेमेंट अ‍ॅपवरूनही तुम्ही सोने खरेदी करू शकता

आपण आपल्या स्मार्टफोनमधूनच डिजिटल सोन्यात गुंतवणूक करू शकता. यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. आपल्या सोयीनुसार आपण कोणत्याही किंमतीचे सोने खरेदी करू शकता. अ‍ॅमेझॉन पे, गूगल पे, पेटीएम, फोनपे आणि मोबिकविक सारख्या प्लॅटफॉर्मवर ही सुविधा उपलब्ध आहे. Gold Investment

Sovereign Gold Bond च्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/invest/bonds-and-securities/sovereign-gold-bonds 

हे पण वाचा :

Multibagger Stock : ‘हे’ 5 फार्मा स्टॉक्स मल्टीबॅगर बनण्याच्या मार्गावर, 2022 मध्ये दिला आहे ‘इतका’ रिटर्न !!!

‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

Toyota RAV4 : TOYOTA ची RAV 4 भारतात लवकरच येणार; पहा फीचर्स आणि सर्वकाही

Gold Price Today : जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण, नवीन दर तपासा

SBI कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार

Leave a Comment