हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Loan : सोने हे भारतीय लोकांच्या गुंतवणुकीचे सर्वांत आवडीचे साधन आहे. सोने हे अडचणीच्या काळातही खूप फायदेशीर ठरते. कारण कठीण प्रसंगात अनेकदा आपल्याला पैशांची गरज भासते आणि कधी कधी अशा प्रसंगी पैशांची व्यवस्था करणे देखील अवघड जाते. अशा संकटामध्ये अनेक मोठ्या बँका आणि नॉन बँकिंग फायनान्सिंग कंपन्यांकडून (NBFCs) गोल्ड लोनची सुविधा दिली जाते. मात्र हे लक्षात घ्या की गोल्ड लोन हे लगेच मिळत असले तरी त्यावरील व्याजदरही जास्त असतो.
अनेक बँका किंवा NBFC कडून आपले सोने तारण ठेवून लोन दिले जाते आणि कर्जाची पूर्ण परतफेड करताच आपल्याला ते परत केले जाते. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे हे कर्ज घेण्यासाठी आपल्याकडील सोने हे 18 कॅरेट ते 22 कॅरेटचे असायला हवे. आपल्याला मिळणारी रक्कम ही लोन टू व्हॅल्यू (LTV) रेश्योवर अवलंबून असते. Gold Loan
RBI च्या नियमांनुसार, आपल्याला सोन्याच्या पूर्ण मूल्याच्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त कर्ज मिळणार नाही. LTV हे तारण ठेवलेल्या सोन्याच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण आहे. जेव्हा बाजारात सोन्याचा दर वाढेल तेव्हा आपल्याला जास्त कर्ज मिळेल. त्याच वेळी, जेव्हा किंमत कमी होईल तेव्हा त्याच कर्जाच्या रकमेसाठी जास्त सोने गहाण ठेवावे लागेल.
चला तर मग कोणत्या बँका Gold Loan वर किती व्याजदर देत आहेत ते पाहुयात…
बँक ऑफ महाराष्ट्र
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सध्या 7 टक्के व्याजदराने गोल्ड लोन उपलब्ध आहे. यासाठी बँकेकडून GST सोबत 500 ते 2000 रुपये प्रोसेसिंग फी आकारली जात आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया
देशातील सर्वात मोठी बँक असलेली SBI 7.5 टक्के व्याजदर देते आहे. यामध्ये आपल्याला 3 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येईल. SBI कडून 0.5 टक्के जीएसटीसह प्रोसेसिंग फी आकारली जात आहे.
कॅनरा बँक
कॅनरा बँकेबद्दल बोलायचे तर, ती गोल्ड लोनवर 7.35 टक्के व्याजदर देत आहे. यामध्ये आपल्याला 500 ते 5000 रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल.
पंजाब आणि सिंध बँक
पंजाब आणि सिंध बँकेकडून सध्या 7 ते 7.5 टक्के व्याजदराने गोल्ड लोन दिले जात आहे. यासाठी 500 रुपये ते 10,000 रुपये प्रोसेसिंग फी आकारली जाते.
युनियन बँक
युनियन बँकेकडून Gold Loan वर 7.25 ते 8.25 टक्के व्याजदर दिला जात आहे.
विविध बँकांच्या गोल्ड लोनच्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/gold-loan.html
हे पण वाचा :
Car Loan : खुशखबर !!! आता अवघ्या 30 मिनिटांत मिळणार कार लोन
Home Loan : आता घर खरेदी करणे महागणार, LIC हाउसिंग फायनान्सकडून होम लोन वरील व्याजदरात वाढ
Home Loan Rate Hike: होम लोन महागल्यानंतर जाणून घ्या आपल्याकडे कोणकोणते पर्याय असतील ???
SBI चा ग्राहकांना झटका! Home Loan, Car Loan झाले ‘इतके’ महाग