रिक्षा अन कारचा भीषण अपघात; पती-पत्नी जागीच ठार (Video)

हिंगोली (रवींद्र पवार) । हिंगोली ते सेनगाव मार्गावर ब्रह्मपुरी पाटीजवळ अपघातात दोघे ठार झाल्याची घटना आज दि.२१ रोजी घडली आहे. अंकुश साहेबराव साबळे व अनुराधा अंकुश साबळे रा.लिंबाला तांडा या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील लिंबाळा हुडी येथील अंकुश साबळे व त्यांची पत्नी अनुराधा साबळे हे दोघे जण आज हिंगोली कडे जात होते. त्याचा ऑटो हिंगोली ते सेनगाव मार्गावर ब्रह्मपुरी पाटीजवळ आला असता अंकुश साबळे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यांचा ऑटो समोरून येणाऱ्या कारवर जाऊन आदळला. त्यानंतर ऑटो रस्त्यावर उलटला अन मोठा अपघात झाला. या अपघातांमध्ये अंकुश व अनुराधा या दोघांचा जागेवर मृत्यू झाला आहे. तर हिंगोली येथून सेनगाव कडे जाणारी कारमधील सेनगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुभाष चव्हाण हे देखील जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरे, सहाय्यक उपनिरीक्षक आर.बी. पोटे जमादार पि. जी.डवले यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी दोन्ही मयतांना उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणात अद्याप पर्यंत नरसी पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.

महत्वाच्या बातम्या –

मोदी सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त; गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त

औरंगाबाद हादरले! दिवसाढवळ्या कॉलेज जवळून ओढत नेत विद्यार्थिनीची हत्या (CCTV)

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कार थेट पुलावरून खाली कोसळली

Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या सराफा बाजाराची गेल्या आठवडाभराची स्थिती

फुकटात सिगरेट न दिल्याने युवकाचा टपरी चालकावर हल्ला! CCTV फुटेज आले समोर