Tuesday, June 6, 2023

पोहणे शिकायला गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड (Beed) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बीडच्या (Beed) अंबेजोगाई येथील पाझर तलावात पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला आहे. शेख अब्रार शेख चाँद असे या मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या शोधकार्यासाठी 24 तास प्रयत्न सुरू होते. अंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यानंतर पाझर तलावावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी तलावात उतरुन शेख अब्रार याला शोधण्याचा प्रयत्न केला पण नागरिकांना यात यश आलं नाही. यामध्ये जोराचा वादळी वारा व पाऊस यामुळे अडथळा निर्माण झाला आणि शोधकार्य थांबवण्यात आले.

परळी नगर परिषदेच्या रेस्क्यु टीमने आज यंत्राद्वारे तलावातील अनेक ठिकाणी हवेचे प्रेशर सोडून तलावातील पाणी ढवळण्यास सुरुवात केली. त्यानंतर शेख अब्रार शेख चाँद याचा मृतदेह तरंगत वरती आला. यानंतर अब्रारचे पार्थिव त्यांच्या घरातील मंडळीं व नातेवाईकांकडे सोपवण्यात आले. तरुण मुलाला मृत अवस्थेत पाहून शेख अब्रार शेख चाँद याच्या कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

हे पण वाचा :

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल