हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Loan : आपल्या दररोजच्या आयुष्यात आपल्याला अनेकदा पैशांची गरज भासते. जेव्हा कधी आपल्याला आपत्कालीन परिस्थितीमध्ये जास्त पैसे लागतात तेव्हा पर्सनल लोन घेतले जाते. मात्र पर्सनल लोन मिळवणे वाटते तितके सोपे नसते. याशिवाय त्यावर जास्त व्याज असते. अशावेळी आपल्या घरातील दागिगे उपयोगी पडतील. करणे या दागिन्यांवर आपल्याला गोल्ड लोन घेता येईल. जे पर्सनल लोनपेक्षा खूपच स्वस्त असते. हे जाणून घ्या कि, गोल्ड लोनमध्ये सिक्युरिटी म्हणून आपले दागिने ठेवले जातात. त्यानंतर आपल्या गरजेनुसार पैसे दिले जातात. यानंतर पैसे भरून दागिने परत मिळतात.चला तर गोल्ड लोन कसे घ्यावे ते जाणून घेउयात…
अशा प्रकारे मिळवता येईल Gold Loan
गोल्ड लोन घेण्यासाठी फारशा कागदपत्रे द्यावी लागत नाही. याशिवाय अनेक बँका खूपच स्वस्त दराने गोल्ड लोन देतात. मात्र यावरील व्याजदर हे कर्जाच्या रकमेवर आणि बँकेवर अवलंबून असतो. सोन्याचे दागिने आणि सोन्याचे नाणे 18 ते 22 कॅरेटमध्ये सिक्युरिटी म्हणून ठेवून गोल्ड लोन घेता येते.
किती गोल्ड लोन मिळेल ???
हे जाणून घ्या कि, Gold Loan ची मर्यादा पूर्णपणे ग्राहक आणि बँकेवर अवलंबून असते. याची मर्यादा बँकेकडे सिक्युरिटी म्हणून देत असलेल्या सोन्याच्या किंवा दागिन्यांच्या वजनाच्या आणि शुद्धतेच्या आधारावर ठरवली जाते. मात्र, बँकेकडून एका ग्राहकाला एकावेळी कमीत कमी 20,000 रुपयांपासून जास्तीत जास्त 1.5 कोटी रुपयांपर्यंत गोल्ड लोन दिले जाऊ शकते. तसेच सर्व बँकांमध्ये यासाठीचे नियम वेगवेगळे असले तरी सोन्याच्या एकूण किंमतीच्या 75% पर्यंत लोन मिळू शकेल.
प्रमुख बँकांमधील Gold Loan चे व्याजदर खालील प्रमाणे
SBI मध्ये Gold Loan 7.00 टक्के व्याजदर आहे, तसेच बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 7.10 टक्के, कॅनरा बँकेमध्ये 7.35 टक्के, पंजाब नॅशनल बँकेमध्ये 7.70 टक्के, बँक ऑफ बडोदामध्ये 8.85% आणि मणप्पुरम गोल्ड लोनमध्ये 9.90% आहे. मात्र बँकांकडून यावर प्रोसेसिंग फी देखील आकारली जाते, जी प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/loans/gold-loan
हे पण वाचा :
Jio च्या ‘या’ प्लॅन अंतर्गत Netflix सबस्क्रिप्शन सहीत मिळवा अनेक फायदे
आता Visa शिवाय ‘या’ देशांत मिळणार प्रवेश, सर्वात स्वस्त देश कोणता ते पहा
एका Credit Card चे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने भरा, फॉलो करा ‘या’ 3 स्टेप्स
New Business Idea : वर्षभर मागणी असणारा ‘हा’ व्यवसाय सुरु करून मिळवा हजारो रुपयांचे उत्पन्न
Bank Loan वसुलीचे नियम काय आहेत ??? बँकेच्या एजंटने कर्जाच्या वसुलीसाठी धमकावल्यास त्वरित करा ‘हे’ काम