औरंगाबाद | सोन्याचे भाव प्रति तोळा तीन ते चार हजाराने घसरल्याने सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. गेल्या महिन्यात 51 हजार किंमत असलेले सोने आता तीन ते चार हजार रुपयांनी कमी झाले आहे. याबरोबरच चांदीचे दरही घसरल्याने सोने-चांदी खरेदीदारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती घटल्यामुळे दर आटोक्यात आली असल्याची माहिती व्यवसायिकांनी यांनी दिली आहे. रविवारी औरंगाबाद शहरात 47 हजार 800 रुपये प्रति तोळा प्रमाणे तर चांदी 69 हजार रुपये प्रति किलोने विक्री करण्यात आली. कोरोना काळात दुसऱ्या लाटेत सोन्या-चांदीच्या किमती वाढतील असे संकेत सराफा व्यावसायिकांनी दिले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडीमुळे सोने-चांदीच्या दरात घट झालेली दिसुन येत आहे.
दर कमी झाल्यामुळे जळगाव येथे सोने खरेदी करांनी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे औरंगाबादेतही दर कमी झाल्यामुळे खरेदीदार सोने घेण्यासाठी घराबाहेर दिसून आले. येत्या काही दिवसात पुन्हा सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे सराफा व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.